22 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरराजकारणगोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

जयंतीनिमित्ताने गोपीनाथ मुंडे यांच्या काही आठवणींवर टाकलेला प्रकाश

Google News Follow

Related

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना १२ डिसेंबर म्हटलं की, आठवण होते ती म्हणजे एका दिग्गज नेत्याची. मातीशी नाळ जोडलेले कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगारांसाठी अविरत झटणारे गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे.

एका सामान्य उसतोड मजूराचा मुलगा ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री असा त्यांचा राजकीय आलेख नेहमी वरचढचं राहिला. त्यांची आज ७३ वी जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या काही आठवणी ताज्या झाल्या आहेत.

मुंबईकरांच्या आठवणीतून ९० चे दशक हे कधीही पुसले जाऊ शकत नाही. १९९३ च्या बॉम्बस्फोटाने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची भीती मुंबईमध्ये वाढली होती. मुंबईमध्ये रोज टोळीयुद्ध होत असे, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दाऊदच्या नावाने लोकांकडून खंडणी मागितली जातं होती. यात फक्त गुंडांचच नाही तर खंडणीला बळी पडलेले दिग्गज बिल्डर, नेते आणि बॉलीवूड सेलिब्रेटींचाही जीव गेला होता. सामान्य लोकांसह दिग्गज लोकही घराबाहेर पडायला घाबरत होते.

यादरम्यान, १९९५ साली शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. गृहमंत्री होताच त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि दाऊदचा खात्मा करण्याचे पोलिसांना आदेश दिले. हे आदेश निघताच संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरले आणि दाऊद भारत सोडून पसार झाला तो आजतागायत कोणाला दिसला नाही. या सर्व गोष्टींनंतर मुंबई सावरायला सुरूवात झाली. गोपिनाथ मुंडे यांनी अडरवर्ल्ड जगताच्या कचाट्यातून मुंबईला मुक्त केले आणि मुंबईला नवा सूर्य दाखवला.

राजकरणात वेळ काळ बघुन प्रसंगी माघार घेणे सुद्धा गोपीनाथ मुंडे यांना सहज जमायचं. म्हणूनच इतर पक्षांतील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंडेंच्या या स्वभावामुळे संभाजीनगरचे महापौरपद भाजपाला मिळाले होते. या महापौरपदाबाबत सुद्धा एक किस्सा सांगितला जातो. संभाजीनगर विषयी एकदा गोपीनाथ मुंडे बाळासाहेब यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी महापौरपदची मागणी केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाहीत, की आमचे नगरसेवक किती तुमचे नगरसेवक किती वगैरे, एका क्षणात म्हणाले की, महापौर पद दिलं. मुंडेंच्या या मनमिळाऊ स्वभावामुळे हे सर्व शक्य होतं होते.

हे ही वाचा : 

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘या’ नेत्याचं नाव

गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

सुखविंदर सिंग सुखू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

सुरुवातीला भाजपावर ब्राह्मणांचा पक्ष असा ठप्पा बसला होता, पण तो मुंडेंच्या नेतृत्वामुळे पुसला गेला. भाजपाला बहुजनांशी जोडायचे काम मुंडेंनी केलं आणि त्यामुळेचं भाजपाला राज्यात आपलं स्थान आणखी बळकट करता आलं. या सगळ्यातूनच १९९५ मध्ये भाजपा-सेना युती महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुढे मात्र, अनेक वर्षांनी भाजपा-सेना युती तुटली. यावेळी गोपीनाथ मुंडे यांचेसुद्धा निधन झाले होते. युती तुटली तेव्हा सर्वांना गोपीनाथ मुंडे यांची उणीव सर्वांना जाणवली. मुंडेंनी युती अभेद्य राखण्यात मोठी भूमिका बजावली होती. अशा या लढवैय्या नेत्याने ३ जून २०१४ मध्ये अखेरचा श्वास घेतला. पुढे १२ डिसेंबर त्यांचा जन्मदिवस हा जयंती म्हणून साजरा केला जाऊ लागला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा