32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरविशेष'पापुआ न्यू गिनी'च्या पंतप्रधानांनी मोदींच्या पायाला केला स्पर्श!

‘पापुआ न्यू गिनी’च्या पंतप्रधानांनी मोदींच्या पायाला केला स्पर्श!

सूर्यास्तानंतर भेट देणाऱ्या नेत्यांचे औपचारिक स्वागत करत नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'प्रोटोकॉल' मोडला गेला

Google News Follow

Related

हिरोशिमा या ऐतिहासिक शहरात जपानच्या अध्यक्षतेखालील जी ७ देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर, पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी येथील पोर्ट मोरेस्बी येथे गेले असता मोदींचे आगळेवेगळे स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पापुआ न्यू गिनी येथे गेले आहेत. पापुआ न्यू गिनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचताच ‘पापुआ न्यू गिनीचे’ पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वागत केले.पण यावेळी त्यांनी चक्क  पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिठी मारून शुभेच्छा स्वीकारल्या.

न्यू गिनी हा हिंद पॅसिफिक महासागरातील एक बेट देश असल्याने आणि हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ते अतिशय महत्त्वाचे असल्याने पंतप्रधानांच्या भेटीला महत्त्व आहे.

पंतप्रधान मोदींनी हिरोशिमा येथे अनेक प्रमुख जागतिक नेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी अनेक जागतिक मुद्द्यांवर फलदायी चर्चा केली. यानंतर पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले,

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी दिली समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ

माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नातीचा सासरच्यांकडून छळ

…म्हणून जी-२० पाहुणे यापुढे गुलमर्गला जाणार नाहीत!

सुषमा अंधारेंनी ठाकरेंवर असे काय गारुड केले?

पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची परंपरा बदलली. साधारणपणे, सूर्यास्तानंतर येणाऱ्या नेत्यांचे औपचारिक स्वागत केले जात नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा प्रोटोकॉल मोडला गेला. पापुआ न्यू गिनी सरकारने त्यांचे अतिशय औपचारिक स्वागत केले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीमध्ये गव्हर्नर-जनरल सर बॉब डॅडे आणि पंतप्रधान जेम्स मारापे यांच्या भेटीसह द्विपक्षीय व्यवहार करणार आहेत.२०१४ मध्ये लाँच केलेल्या, FIPIC मध्ये भारत आणि १४ पॅसिफिक बेट देश (PICs) समाविष्ट आहेत -त्यातील फिजी, पापुआ न्यू गिनी, टोंगा, तुवालू, किरिबाटी, सामोआ, वानुआतु, नियू, मायक्रोनेशियाचे संघराज्य, मार्शल बेटांचे प्रजासत्ताक, कुक बेटे, पलाऊ , नाउरू आणि सोलोमन बेटे हे १४ सदस्य देश आहेत.

पापुआ न्यू गिनी दौऱ्याची सांगता केल्यानंतर, पंतप्रधान मोदी  सिडनीला जाणार आहेत. २३ मे रोजी ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा