परीक्षेचा निकाल चांगला या आल्यास आल्यास कुटुंबातील निराशेला सामोरे कसे जायचे? आजकाल विद्यार्थी नस कापून घेतात, भावनांच्या आहारी जाऊन दुसऱ्यांवर विश्वास ठेवत नाहीत अशा वेळी काय करावे? मदुराई येथील अश्विनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अश्विनीला म्हणाले तू क्रिकेट खेळतेस का ? असा प्रश्न केला आणि थेट क्रिकेटच्या मैदानात नेले. क्रिकेटच्या मैदानात कितीही आरडा ओरडा सुरु असला तरी फलंदाजाचे लक्ष्य चेंडूकडे असते आणि त्यानुसार तो खेळी खेळतो. थोडक्या चहूबाजूने कितीही दबाव असला तरी तुम्ही एकाग्र राहणे महत्वाचे आहे हे पंतप्रधानांनी खुप सुदंर शब्दात समजावून सांगितले.
हे ही वाचा:
पद्मभूषण विजेते भैरप्पा म्हणतात, बीबीसीची डॉक्युमेंट्री देशाचे नाव खराब करण्यासाठी
अलीगढ विद्यापीठात एनसीसी कॅडेट्सनी दिल्या अल्ला हु अकबरच्या घोषणा
अमृता फडणवीस यांचे देशभक्तीपर नवीन गीत
अदानी उद्योगसमुहाची मोठी घसरगुंडी; हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे मोठा गोंधळ
पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही कधी क्रिकेट पाहायला गेलात का,? संपूर्ण स्टेडियम चौका-चौका, छक्का-छक्का असे ओरडत असते. फलंदाज प्रेक्षकांच्या मागणीनुसा चौकार-षटकार मारतो का? फलंदाजाचे लक्ष फक्त चेंडूवर असते. गोलंदाजाच्या मनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. तो चेंडू जसा आहे तसा खेळतो. सर्व बाजूंनी दबाव निर्माण होतो. आपण या दबावांना बळी पडावे का? तुम्ही एकाग्र राहिल्यास दबाव हाताळण्यास सक्षम व्हाल. संकटातून बाहेर याल. दबावाखाली राहू नका तर दबावाचे विश्लेषण करा. तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात का याचा विचार करा. मुलांनी आपल्या क्षमतांना कधी कमी लेखू नये. अशा प्रकारे आपण आपल्या समस्या सहज सोडवू शकू.
कुटुंबीयांच्या अपेक्षा असतील तर ते स्वाभाविक आहे. यात चुकीचे काही नाही, पण सामाजिक स्थितीमुळे कुटुंबातील सदस्य अपेक्षा करत असतील तर ती चिंतेची बाब आहे. त्यांच्या सामाजिक स्थितीचे इतके दडपण आहे की त्यांना वाटते की आपली मुले समाजात जाऊन काय सांगतील. मुलं अभ्यासात कच्ची असतील तर चर्चा कशी करणार. आई वडिलांना आपल्या पाल्याच्या क्षमता माहिती असतात तरी ते क्लब-सोसायटीत जाऊन मुलांबद्दलच बोलतात. आपल्या मुलांबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. घरी आल्यावरही त्यांना तीच अपेक्षा असते. सामाजिक जीवनात ही रोजची गोष्ट झाली आहे.







