मुस्लिम संघटनेची मागणी, तेलुगू भाषेतील ‘छावा’चे प्रदर्शन थांबवा!

मुस्लीम संघटनेवर नेटकऱ्यांची टीका 

मुस्लिम संघटनेची मागणी, तेलुगू भाषेतील ‘छावा’चे प्रदर्शन थांबवा!

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘छावा’ देशभरात धुमाकूळ घालत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून लवकरच ५०० कोटींच्या घरात पोहोचणार आहे. अशातच आता छावाची जादू तेलुगूमध्येही चालणार आहे. चाहत्यांच्या प्रचंड मागणीनंतर ‘चावा’ हा चित्रपट तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. याबाबत चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टर जारी करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने हिंदीमध्ये चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला असून आता तेलुगूमध्येही हिट होण्यास सज्ज आहे. याच दरम्यान, काही कट्टरवादी संघटनांकडून ‘छावा’ चित्रपटाच्या तेलेगु भाषेच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे.

आंध्र प्रदेशातील मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष मोहम्मद झियाउल हक यांनी चित्रपटाच्या आशयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. झियाउल हक यांनी नेल्लोर जिल्हाधिकाऱ्यांकडे औपचारिकपणे याचिका दाखल केली आहे आणि तेलुगू राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी विनंती केली. दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाला अशा विरोधाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चित्रपटाच्या हिंदी रिलीजवरही अशाच प्रकारची टीका झाली होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाला आणि आकडेवारीनुसार, चित्रपटाने ४७८ कोटींहून अधिक कमाई केली आहे तर ५०० कोटींचा आकडा लवकरच गाठणार असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा : 

जयशंकर यांच्या ताफ्यासमोर खलिस्तानींच्या निदर्शनावर भारताने ब्रिटनला सुनावले

‘रमझानचा रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी धर्माचा गुन्हेगार’

सैन्याच्या विमानातून नागरी वस्तीत चुकून झाला बॉम्बवर्षाव आणि…

जयकुमार गोरेंकडून संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग

दरम्यान, आंध्र प्रदेशातील मुस्लिम फेडरेशनने चित्रपटा विरोधात केलेल्या मागणीनंतर सोशल मिडीयावर त्यांच्यावर टीका केली जात आहे. ‘मला वाटले की सर्व मुघल मेले आहेत, पण त्यांचे उत्तराधिकारी अजूनही फिरत आहेत,’ असे एकाने सोशल मिडीयावर म्हटले आहे.

एकाने लिहिले, काही हिंदू नेल्लोरमध्ये निरर्थक ‘मुस्लिम रोटी उत्सव’ साजरा करण्यासाठी जातात. तिथे जाणाऱ्या हिंदूंना स्वतःची लाज वाटली पाहिजे, त्यांनी अशा बनावट उत्सवांवर बहिष्कार टाकला पाहिजे. दरम्यान, ‘छावा’ चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी आंध्र प्रदेशातील चित्रपटगृहांमध्ये तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यानंतर, छावाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी वाढणार आहे. तसेच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री हिंदू धर्म रक्षक पवन कल्याण चित्रपट
रिलीजच्या दिवशी कुटुंबासह चित्रपट पाहणार असल्याची माहिती आहे.

Exit mobile version