भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी धर्मगुरूंच्या निशाण्यावर आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी म्हटलं की, शमीनं पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवला नाही. त्यांनी सांगितलं की, या क्रिकेटपटूने रोजा न ठेवून मोठा गुन्हा केला आहे आणि शरीयतनुसार तो गुन्हेगार आहे.
दुबईत खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसला आणि त्याचा फोटो व्हायरल झाला. या फोटोवरून मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी नाराजी व्यक्त केली आणि शमीला सल्ला दिला आहे.
मौलाना शहाबुद्दीन यांनी शमीच्या रोजा न ठेवण्यावर आक्षेप घेतला आणि सांगितलं, इस्लामनं रोजा ठेवणं कर्तव्य ठरवलं आहे आणि कोणीही जाणूनबुजून रोजा ठेवत नाही तर तो गुन्हेगार आहे. मोहम्मद शमीनं हेच केलं आहे, त्याने रोजा ठेवला नाही, तर रोजा ठेवणं त्यांचं कर्तव्य होतं. रोजा न ठेवून मोहम्मद शमी मोठा गुन्हेगार ठरला आहे आणि शरीयतनुसार तो मोठा गुन्हेगार आहेत.
हे ही वाचा:
सैन्याच्या विमानातून नागरी वस्तीत चुकून झाला बॉम्बवर्षाव आणि…
देवभूमी उत्तराखंड अध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण
यूपीच्या कौशांबीतून दहशतवाद्याला अटक
विधानपरिषद निवडणुकीतील विजय समृद्ध तेलंगणा निर्मितीचे पाऊल
मौलाना शहाबुद्दीन म्हणाले की, “मोहम्मद शमीला असं अजिबात करणं योग्य नव्हतं. मी त्यांना इशारा आणि सल्ला देतो की, इस्लामचे नियम पाळावेत. क्रिकेट आणि खेळ खेळावेत, सगळं काही करावं, पण अल्लाहनं दिलेल्या जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्यात. या सगळ्या गोष्टी मोहम्मद शमीला समजायला हव्यात.
मोहम्मद शमी सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहे. भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असून त्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मोहम्मद शमी हा अनेकवेळा वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. त्याच्या पत्नीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता आता रमझानच्या निमित्ताने तो लक्ष्य ठरला आहे.