25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरविशेष‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’

‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’

Related

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज स्मरण केले आहे. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ट्विटरवर ट्विट करून त्यांना नमन केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘आदरणीय अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,’ असे मोदी यांनी म्हटले आहे. ‘अटलजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत आहोत. आम्ही त्यांच्या राष्ट्रसेवेने प्रेरित झालो आहोत. त्यांनी भारताला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या विकास उपक्रमांचा लाखो भारतीयांवर सकारात्मक परिणाम झाला,’ असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

शेणापासून बनवलेला रंग चालला परदेशात

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!

… म्हणून कोरोना मृतांच्या यादीत चक्क जिवंत माणसे!

अटलजी हे दूरदृष्टी असणारे नेते होते, असे नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. पोखरण- II अणुचाचण्या केल्या. अटलजी यांनी पाकिस्तान आणि भारत यांचे राजनैतिक संबंध सुधारवण्याचा प्रयत्न केला. १९९९ च्या कारगिल युद्धानंतर त्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना आग्रा येथे शिखर परिषदेसाठी भारतात आमंत्रित करून पाकिस्तानशी संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला होता. अटलजी हे आजही देशातील सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा