33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषपंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ध्वजारोहणाचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ध्वजारोहणाचा विक्रम

लाल किल्ल्यावर सलग दहाव्यांदा ध्वजारोहण

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जेव्हा ७६व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतील. पंतप्रधान मोदी यांचे हे सलग दहावे ध्वजारोहण असेल.  तेव्हा त्यांनी एका विक्रमाची बरोबरी केली असेल. मनमोहन सिंग यांनी सलग दहावेळा ध्वजारोहण केले होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतापर्यंत सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करणारे तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत. आतापर्यंत भारताला १५ पंतप्रधान लाभले आहेत. त्यातील १३ पंतप्रधानांना लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे. गुलझारीलाल नंदा आणि चंद्र शेखर यांना स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकवण्याची संधी लाभली नव्हती.

 

सर्वाधिक वेळा ध्वजारोहण करण्याचा मान भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे जातो. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा, झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी पहिल्यांदा ध्वजारोहण केले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजेच २७ मे, १९६४पर्यंत त्यांनी सलग १७ वेळा ध्वजारोहण केले. त्यानंतर नेहरू यांची कन्या आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा क्रमांक लागतो. त्यांना १६वेळा ध्वजारोहणाची संधी मिळाली आहे. अर्थात नेहरूंसारखी ही संधी त्यांना सलग मिळालेली नाही. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीमध्ये हे ध्वजारोहण केले आहे. त्यांच्या ध्वजारोहणात चार वर्षांचा खंड पडला होता.

 

 

इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी, १९६६ रोजी पहिल्यांदा ध्वजारोहण केले होते. त्यानंतर २४ मार्च, १९७७ पर्यंतच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी सलग ११वेळा ध्वजारोहण केले. त्यानंतर पुन्हा १४ जानेवारी, १९८० ते ३१ ऑक्टोबर, १९८४ या दरम्यानच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांना सलग पाचवेळा ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. ३१ ऑक्टोबरला त्यांची हत्या करण्यात आली होती.

 

हे ही वाचा:

इराणमधील प्रमुख शिया धार्मिक स्थळावर गोळीबार

फाळणी अर्थात ‘विभाजन विभिषिका दिनी’ स्मरण !

शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !

सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान राहिलेल्या मनमोहन सिंग यांनी २२ मे २००४ ते २६ मे २०१४ या कार्यकाळात सलग १०वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. आता ७६व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या या विक्रमाशी बरोबरी करतील. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सहावेळा ध्वजारोहण केले होते. त्यांनी दोनदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाची संधी मिळाली होती. त्यांचे सरकार १६ मे १९९६ ते १ जून १९९६ या कार्यकाळापुरतेच राहिले होते. तर, दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी १९ मार्च, १९८८ ते २२ मे, २००४ या कालावधीपर्यंत सहावेळा ध्वजारोहण केले.

 

इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी यांनी २ डिसेंबर, १९८९पर्यंत सलग पाचवेळा ध्वजारोहण केले होते. राजीव गांधी यांच्या या ध्वजारोहण विक्रमाची बरोबरी त्यानंतर आलेल्या काँग्रेसच्या पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केली होती. ते २१ जून, १९९९ ते १६ मे, १९९६ या कालावधीत पंतप्रधान होते. तर, लालबहाद्दूर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांना दोनवेळा ध्वजारोहणाची संधी मिळाली होती. तर, चरणसिंग, व्ही. पी. सिंग, एच डी देवेगौडा आणि आय के गुजराल यांना एकदा ध्वजारोहणाची संधी मिळाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा