31 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरविशेषपूनम पांडे जिवंत, गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केला स्टंट

पूनम पांडे जिवंत, गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केला स्टंट

शेअर केला व्हीडिओ

Google News Follow

Related

वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे ही मृत्युमुखी पडलेली नसून ती जिवंत आहे, असे तिनेच जाहीर केले असून गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आपण याच कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडल्याची बातमी पसरवल्याचे तिने मान्य केले आहे.

शनिवारी तिने व्हीडिओच्या माध्यमातून आपण जिवंत असल्याचे स्पष्ट केले. तिने त्यात म्हटले आहे की, मला हे शेअर करताना आनंद होत आहे की, मी इथेच आहे जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही. पण याच कर्करोगामुळे हजारो महिलांचे जीव जात अशतात. या रोगाशी कशी झुंज द्यायची हे अनेक महिलांना कळत नाही, त्यामुळे आपण त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलले.

पूनम पांडेने पुढे म्हटले आहे की, गर्भाशयाचा कर्करोग हा बरा होणारा आहे. एचपीव्ही लस आणि कर्करोग झाल्याचे लवकर निदान झाले तर हा रोग निश्चित बरा होऊ शकतो. या रोगामुळे कुणाचाही बळी जाऊ नये असे प्रयत्न आपण केले पाहिजेत.

हे ही वाचा:

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’

आडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब

४० जागा तरी जिंकता येतील का? ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर केला प्रहार

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या मित्राच्या घरावर गोळीबार

या रोगासंदर्भात कोणती पावले उचलली पाहिजेत याबाबत एकमेकांना सहकार्य करावे आणि लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. आपण सगळ्यांनी मिळून या रोगामुळे होणाऱ्या परिणामावर विचार केला पाहिजे. या रोगाचा अंत आपण केला पाहिजे, असेही पूनम पांडे हिने म्हटले आहे.

याआधी, पूनम पांडे हिचे ३२व्या वर्षी गर्भाशयाच्या रोगामुळे निधन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. मात्र तिचे निधन झाल्याची बातमी प्रसिद्ध होऊ लागल्यानंतर तिच्या घरच्यांकडून मात्र कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. तिच्यावर कुठे अंत्यसंस्कार होणार हेदेखील स्पष्ट केले जात नव्हते. दोन दिवस त्यावर विविध प्रकारची चर्चा येत होती. त्याच दरम्यान, गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय यावरूनही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यातच तिचे काही दिवसांपूर्वीचे व्हीडिओदेखील समोर येऊ लागले. त्यात तिला असा कोणता रोग झाला असल्याचे स्पष्ट होत नव्हते. तिच्या वाहनचालकानेही २९ जानेवारीला तिला गाडीतून सोडल्याचे म्हटले होते मात्र त्याच्याही बोलण्यात या रोगाविषयी काही समोर आले नाही. एकूणच हे सगळे संदिग्ध वातावरण असताना अचानक पूनम पांडेने व्हीडिओ जारी करत आपण जिवंत असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात आता विविध प्रतिक्रिया उमटत असून अशा पद्धतीने बातमी पसरवून समाजात खळबळ उडविणे योग्य आहे का, याबाबत कारवाई केली जाऊ शकते का, याचीही चर्चा होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा