१३ जानेवारीपासून सुरु झालेल्या महाकुंभाचा आजचा नववा दिवस आहे. गंगेत स्नान करण्यासाठी घाटांवर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. आज (२० जानेवारी) सकाळपर्यंत १५.९७ लाख भाविकांनी केले स्नान केले तर काल ५४.९६ लाख लोकांनी संगमात स्नान केले. महाकुंभाच्या सुरवातीपासून आतापर्यंत ८.८० कोटी भाविकांनी स्नान केले आहे.
महाकुंभात पंचकोशी परिक्रमेला सुरुवात, प्रमुख मंदिरांना संत भेट देणार
प्रयागराज येथे सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यात सोमवारपासून तीर्थराज प्रयागराजची पंचकोशी परिक्रमा सुरू झाली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या नेतृत्वाखाली साधू-संतांनी त्रिवेणीच्या तीरावर गंगापूजन करून परिक्रमेला सुरुवात केली. पाच दिवस चालणाऱ्या या प्रवासात संगम शहरातील सर्व प्रमुख देवतांच्या मंदिरांचे दर्शन व पूजा करून पुण्य प्राप्त होणार आहे.
हे ही वाचा :
… म्हणून विवेक रामास्वामी यांचा ट्रम्प सरकारमधील DOGE चे काम पाहण्यास नकार!
गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोजर फिरणार, फडणवीसांनी दिली तारीख!
‘WHO’ are you? ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली पाठ
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर १६ नक्षलवाद्यांचा खात्मा; एक कोटींचे बक्षीस असलेला चलपती ठार
त्रिवेणीच्या तीरावर गंगा पूजन व आरती केल्यानंतर ऋषी-मुनी दर्शन व पूजेसाठी गडावर वसलेल्या अक्षय वटवर पोहोचले. सर्व संतांनी संगमाच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरालाही भेट दिली. या पंचकोशी परिक्रमेत जिल्ह्यातील १२ माधव, नाग वासुकी मंदिर, दशस्वमेध मंदिर, मनकामेश्वर मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिर, दुर्वासा आश्रम, भारद्वाज आश्रम, पाडिला महादेव मंदिर यासह जिल्ह्यातील पौराणिक महत्त्व असलेल्या मंदिरांमध्ये दर्शन व पूजा करण्यात येणार आहे.
जुना आखाड्याचे संरक्षक व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी महाराज व सरचिटणीस महंत हरी गिरी महाराज यांच्या हस्ते पंचकोशी परिक्रमेची सुरुवात झाली. यात मोठ्या संख्येने संत सहभागी झाले होते. प्रयागराजमध्ये पंचकोशी परिक्रमेला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी माघ महिन्यात संत पंचकोशी परिक्रमेद्वारे तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन पूजा करतात. महाकुंभ २०१९ च्या आधी २०१७ मध्ये ही परिक्रमा पुन्हा सुरू करण्यात आली होती. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी म्हणाले की, आखाडा परिषदेचे सरचिटणीस यांच्या प्रयत्नांमुळे ही जुनी परंपरा पुन्हा जिवंत झाली आहे. २०१७ पासून हा प्रवास अखंडपणे सुरू आहे.







