33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरविशेषन्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नावावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर

न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नावावर राष्ट्रपतींच्या मान्यतेची मोहोर

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल २०२१ रोजी संपत आहे. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांची निवड पक्की झाली आहे. त्यांच्या नावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील आपल्या मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

Google News Follow

Related

भारताचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे हे लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांचे नाव सुचवण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नावाला मंजूरी दिल्यामुळे भारताचे ४८ वे सरन्यायाधीश हे पद भूषविण्याचा सन्मान रामण्णा यांना लाभणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी नियुक्त होण्यापूर्वी रामण्णा दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश होते. न्यायमुर्ती शरद बोबडे हे २३ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर रामण्णा सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्विकारतील. न्यायमुर्ती रामण्णा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे.

हे ही वाचा:

लोकांनी कसं वागावं हे सांगता ते स्वतः कधी वागणार- राज ठाकरेंचा सवाल

गृहमंत्री पद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे

नरेंद्र मोदींचे नागरिकांना पंचभाषिक आवाहन

न्यायमुर्ती रामण्णा यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आंध्र प्रदेशच्या विविध न्यायालयांतून त्यांनी वकीली केली. त्यानंतर त्यांची २७ जुन २००० रोजी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणुक झाली होती. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायधीश म्हणून १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत काम पाहिले होते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांच्याविरोधात अमरावती जमिन घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशी करून रेड्डी यांनी केलेल्या सर्व आरोपांना फेटाळून लावले. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी देखील मान्यतेची मोहोर उमटवल्यामुळे सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमुर्ती एन व्ही रामण्णा यांचे नाव निश्चि झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा