26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषआरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आराखडा तयार करा

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आराखडा तयार करा

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Google News Follow

Related

राज्यात लोकसंख्यानिहाय आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत बळकटीकरणावर भर देत दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी राज्याच्या बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. विधान भवन येथे समिती कक्षात आरोग्य विभागाच्या बांधकामाधीन इमारतींचा आढावा बैठकीत आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात उभारण्यात आलेल्या आरोग्य संस्थांच्या इमारतींचा रुग्णसेवेत उपयोग करावा. मागणीप्रमाणे आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात यावे. आरोग्य संस्थांच्या इमारतींची अंदाजपत्रके तपासून घेण्यात यावीत. रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणार आहार आणि मनुष्यबळ याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. स्वच्छतेबाबत कटाक्षाने कारवाई करावी. स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे. कामात व्यत्यय आणून काम बंद पाडणाऱ्या तसेच कामात कुचराई करीत असलेल्या कंत्राटदारांना काळे यादीत टाकावे संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिले.

हेही वाचा..

सिंगापूरचे नाव संस्कृतमधून आले…भारताच्या प्राचीन प्रभावाची छाप

राहुल गांधीच्या परदेश दौर्‍यावर काय म्हणाले कुशवाह ?

कंगना रनौत भडकल्या

कोणालाही ‘वंदे मातरम’ गाण्यात आपत्ति असू नये

ठाणे सामान्य रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून रुग्णालय रुग्णसेवेत रुजू करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री यांनी दिले. बैठकीत संगमनेर (जि. नगर) येथील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिवती ग्रामीण रुग्णालय (जि. चंद्रपूर), डागा रुग्णालय नागपूर, उमरेड उपजिल्हा रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसी ता. उमरेड, प्राथमिक आरोग्य केंद्र नांद ता भिवापूर, कुही (जि नागपूर) ग्रामीण रुग्णालय, धाराशिव जिल्हा रुग्णालय, मलकापूर (ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर) येथील ग्रामीण रुग्णालय, पालघर जिल्ह्यातील मनोर ट्रॉमा केअर आणि अन्य रुग्णालयांचा कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार विनय कोरे, प्रवीण दटके, कैलास पाटील, संजय मेश्राम, विलास तरे, आमदार देवराव भोंगळे, अमोल खताळ, शांताराम मोरे उपस्थित होते. तसेच संचालक डॉ नितीन अंबाडेकर, सहसंचालक कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा