32 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरविशेषआसियान शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फिलिपिन्स दौऱ्यावर

आसियान शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फिलिपिन्स दौऱ्यावर

विविध देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान फिलिपिन्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते राजधानी मनिला येथे होणाऱ्या ४९ व्या आसियान शिखर परिषदेसह २३ व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि २१ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व) रुपेंद्र टंडन यांनी गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या दौऱ्यादरम्यान फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर हे शिखर परिषदेसाठी आलेल्या विविध देशांच्या प्रमुखांसाठी विशेष रात्रभोजनाचे आयोजन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी संबंधित बैठकांमध्ये सहभागी होतील. या परिषदांच्या पार्श्वभूमीवर विविध देशांच्या प्रमुखांशी त्यांच्या द्विपक्षीय भेटीही नियोजित आहेत. तसेच फिलिपिन्समधील भारतीय समुदायाची भेट घेण्याची मोदींची इच्छा असून, त्यांच्या कार्यक्रमात या भेटीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टंडन यांनी सांगितले.

‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाला महत्त्व

आसियानमधील सर्व ११ सदस्य देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध आहेत. आग्नेय आशियाई देशांसोबत आर्थिक, राजनैतिक आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने आसियानचे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणातही या संघटनेला विशेष स्थान आहे. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया आणि तिमोर-लेस्ते हे आसियानचे ११ सदस्य देश आहेत.

हे ही वाचा:

सोलापूर विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान विमानाचे हार्ड लँडिंग

संभलमध्ये मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!

महापौर कार्यालयासह मुंबईतील सहा ठिकाणांना धमकी

पूर्व आशिया शिखर परिषदेत जागतिक सुरक्षा, राजकीय घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. यंदाच्या आसियान परिषदेची संकल्पना ‘नेव्हिगेटिंग द फ्युचर’ अशी आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्यावर या परिषदेत भर दिला जाणार आहे. यंदा फिलिपिन्सकडे आसियानचे अध्यक्षपद आहे. या परिषदेसाठी किमान १९ जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचाही सहभाग अपेक्षित असल्याने मनिला येथील बैठकींकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणाले की, “आपल्या सभोवतालच्या बदलांना सामोरे जाण्यासाठी अधिक लवचिक बनण्याकरिता, एकमेकांशी सहकार्य कसे वाढवायचे” यावर नेते प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतील. फिलिपिन्समध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये पंतप्रधान मोदींना भेटण्याबाबत असलेला उत्साह अधोरेखित करत, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या समुदायासोबतच्या बैठकीचा समावेश करण्यासाठी पंतप्रधानांच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. “पंतप्रधानांना भेटण्याची भारतीय समुदायाकडूनही जोरदार मागणी आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या वेळापत्रकात तेदेखील जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा