27.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेष‘लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात

‘लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात

आतापर्यंत ८० लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ

Google News Follow

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत ८० लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, दिनांक १४ ऑगस्ट पासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात ८० लाख महिलांच्या बँक खात्यात २ महिन्यांच्या लाभाची रक्कम ३ हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा १७ ऑगस्ट पर्यत हा लाभ मिळणार आहे.

हे ही वाचा:

कुवेतमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक; पाकिस्तानी महिलेशी केला विवाह, राजस्थानात अटक

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधींना मागची सीट, सरकारने दिले उत्तर !

आता केजरीवालांना हटवा!

कोलकाता बलात्कार प्रकरण, अज्ञातांकडून रुग्णालयाची तोडफोड !

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा