27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषस्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधींना मागची सीट, सरकारने दिले उत्तर !

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधींना मागची सीट, सरकारने दिले उत्तर !

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग ११व्यांदा देशाला संबोधित केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत शेवटच्या रांगेत बसलेले दिसले. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. काँग्रेसनेही राहुल यांच्या बसण्याबाबत प्रश्न विचारले आहेत.

वास्तविक, राहुल गांधी यांच्या पुढे ऑलिम्पिक पदक विजेते बसलेले दिसले. राहुल गांधी ज्या रांगेत बसले आहेत त्याच रांगेत त्याच्यासोबत हॉकी संघाचे काही खेळाडूही बसले आहेत.राहुल यांच्या मागे आणखी दोन रांगा आहेत, ज्यात आणखी काही पाहुणे बसले आहेत. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे १० वर्षात पहिल्यांदाच एखादा विरोधी पक्ष नेता लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होता. अशा स्थितीत त्याला पाठीमागे बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर सरकारकडून एक निवेदनही समोर आले आहे.

हे ही वाचा :

कुवेतमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक; पाकिस्तानी महिलेशी केला विवाह, राजस्थानात अटक

गंमतच आहे! कोलकात्यातील बलात्कार, हत्या प्रकरणी ममताच काढणार निषेध मोर्चा

पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंची घेतली भेट !

पोलिसांच्या नाकाबंदीत २ कोटींचा ड्रग्स साठा जप्त, एकाला अटक

राहुल गांधींना पाठीमागे बसवलं जात असल्याबद्दल काँग्रेसनं कार्यक्रमातही राजकारण केलं जात असल्याचा सरकारवर आरोप केला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा म्हणाले की, “संरक्षण मंत्रालय इतका वाईट व्यवहार का करत आहे?. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसवले आहे. विरोधी पक्षनेतेपद हे कोणत्याही केंद्रीय मंत्र्यापेक्षा मोठे असते. लोकसभेत पंतप्रधानानंतर ते येतात. राजनाथ सिंह जी तुम्ही संरक्षण मंत्रालयाला राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकारण करण्याची परवानगी कशी देऊ शकता? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे विवेक तनखा यांनी म्हटले.

राहुल गांधी यांच्या बसण्याच्या स्थितीबाबत होत असलेल्या राजकारणावर सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, यावेळी पुढची रांग ऑलिम्पिक पदक विजेत्यांना द्यावी लागली, त्यामुळे राहुल गांधींना मागच्या रांगेत बसावे लागले. दरम्यान, यावेळी काही केंद्रीय मंत्र्यांनाही मागच्या रांगेत बसावे लागल्याची माहिती आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात बसण्याचा काय आहे प्रोटोकॉल ?
प्रोटोकॉलनुसार लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला नेहमी पुढच्या रांगेत जागा दिली जाते. यावेळी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, अमित शहा आणि एस जयशंकर समोरच्या रांगेत बसले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा