27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरक्राईमनामापोलिसांच्या नाकाबंदीत २ कोटींचा ड्रग्स साठा जप्त, एकाला अटक

पोलिसांच्या नाकाबंदीत २ कोटींचा ड्रग्स साठा जप्त, एकाला अटक

एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा

Google News Follow

Related

ऐरोली टोलनाक्यावर २ कोटी रुपयांच्या एमडी या अमली पदार्थासह एकाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद कलिम चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा सहकारी साकीब हा फरार झाला आहे.हे दोघे कुर्ला पश्चिम हलाव पूल आणि सुंदरबाग येथे राहणारे आहेत. मोहम्मद आणि साकीब हे दोघे कल्याण येथून महापे नवीमुंबई मार्गे मुंबईच्या दिशेने निळ्या रंगाच्या मोटारीने निघाले होते.

ऐरोली टोल नाका येथे नवघर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत मोहम्मद याला मोटारीसह ताब्यात घेतले, दरम्यान दुसरा सहकारी साकीब हा तेथून निसटला, पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता पोलिसांना २ किलो २९ ग्राम मफेड्रोन हा अमली पदार्थ मिळून आला.

हे ही वाचा:

अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे झाले वेगळे!

मुंब्र्यात आला टिपू सुलतान; तिरंगा रॅलीत झळकले फोटो !

राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत २कोटी ७ लाख रुपये असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली. या प्रकरणी मोहम्मद याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या सहकारी साकीब याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा