30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरविशेषगंमतच आहे! कोलकात्यातील बलात्कार, हत्या प्रकरणी ममताच काढणार निषेध मोर्चा

गंमतच आहे! कोलकात्यातील बलात्कार, हत्या प्रकरणी ममताच काढणार निषेध मोर्चा

सीबीआयला रविवारपर्यंत छडा लावण्याची ममतांनी दिली मुदत

Google News Follow

Related

कोलकात्यात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत असताना आणि बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारकडून अक्षम्य दिरंगाई झालेली असताना आता ममता बॅनर्जीच या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून निषेध मोर्चा काढणार आहेत. न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले असून आता ममता बॅनर्जी या प्रकरणाचे सारे खापर सीबीआयवर फोडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांनी पुढील रविवारपर्यंत या तरुणीला न्याय द्या असा इशाराच सीबीआयला दिला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौलाली ते धरमतला असा हा मोर्चा काढण्याचे ठरविले असून १७ ऑगस्टला हा मोर्चा निघेल.

ममतांनी म्हटले आहे की, या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे. मला आशा आहे की, येत्या रविवारपर्यंत सीबीआय त्या तरुणीला न्याय देईल.

गमतीचा भाग म्हणजे १२ ऑगस्टला या प्रकरणात कोलकाता पोलिसांकडून कोणतेही ठोस पुरावे मिळत नसल्यामुळे ममतांनी त्यांना इशारा दिला होता की, तुम्ही जर या प्रकरणाचा छडा लावू शकला नाहीत तर मी हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करेन. पण त्यानंतरच कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले. या तरुणीच्या पालकांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली होती.

हे ही वाचा:

मुंब्र्यात आला टिपू सुलतान; तिरंगा रॅलीत झळकले फोटो !

आता केजरीवालांना हटवा!

पंतप्रधान मोदींनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंची घेतली भेट !

पवारांनी वाटोळे केले ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…

आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना ममतांनी भाजपा आणि कम्युनिस्ट पक्षांना लक्ष्य केले. आपल्या सरकारविरोधात या पक्षांनी बदनामी करण्याची मोहिम चालविल्याचा आरोप ममतांनी केला.

आम्ही या प्रकरणात काय केले नाही? आम्ही कोणती कारवाई केली नाही? मला जेव्हा या घटनेबद्दल कळले तेव्हा मी पोलिस आयुक्तांशी बोलले आणि त्या मुलीच्या पालकांशीही बोलले. त्या मुलीच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याऐवजी भाजपा आणि सीपीआय (एम) हे पक्ष घाणेरडे राजकारण खेळत आहेत. त्यांना असे वाटते की, ते इथे बांगलादेशसारखे काही करू शकतील. मला त्यांना सांगायचे आहे की, मी सत्तेची भुकेली नाही. मी त्या तरुणीच्या पालकांना सांगितले की, ते आरोपी फासावर लटकावले जातील आणि मी त्यावर कायम आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा