30.1 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरविशेषलोकांचा सहभाग हीच 'नमामि गंगे' मोहिमेची ऊर्जा

लोकांचा सहभाग हीच ‘नमामि गंगे’ मोहिमेची ऊर्जा

मन कि बात कार्यक्रमात जनतेशी संवाद

Google News Follow

Related

‘नमामि गंगे’ मोहिमेची सर्वात मोठी ऊर्जा म्हणजे लोकांचा सततचा सहभाग. नमामि गंगे मिशनमुळे जैवविविधता सुधारण्यातही मदत झाली. इकोसिस्टिमची पुनर्स्थापना करणाऱ्या जगातील १० अव्वल उपक्रमांमध्ये संयुक्त राष्ट्र संघाने नमामि गंगे मिशनच समावेश केला आहे. जगभरातील अशा १६० उपक्रमांमधून नमामि गंगेला हा मान मिळाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मन कि बात कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.

आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा गंगा मातेशी अतूट संबंध आहे. गंगाजल हे आपल्या जीवनप्रवाहाचा अविभाज्य भाग आहेअशा परिस्थितीत शतकानुशतके वाहणारी आई गंगा स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे. या उद्देशाने आठ वर्षांपूर्वी आम्ही ‘नमामि गंगे अभियान’ सुरू केले. आज भारताच्या या उपक्रमाचे जगभरातून कौतुक होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की ‘नमामि गंगे’ मोहिमेची सर्वात मोठी ऊर्जा म्हणजे लोकांचा सततचा सहभाग. ‘नमामि गंगे’ मोहिमेत गंगाप्रहरी आणि गंगा दूत यांचाही मोठा वाटा आहे. वृक्षारोपण, घाटांची स्वच्छता, गंगा आरती, पथनाट्य, चित्रकला आणि कवितांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात ते मग्न आहेत.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

पंतप्रधान म्हणाले, या मोहिमेमुळे जैवविविधतेतही बरीच सुधारणा होताना दिसत आहे. हिल्सा मासे, डॉल्फिन आणि कासवांच्या विविध प्रजातींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गंगेची परिसंस्था स्वच्छ असल्याने उपजीविकेच्या इतर संधीही वाढत आहेत.

जैवविविधता लक्षात घेऊन तयार केलेल्या ‘जलचर आजीविका मॉडेल’ कडे लक्ष वेधताना पंतप्रधान मोदी यांनी ही पर्यटन आधारित बोट सफारी २६ ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. ‘नमामि गंगे’ मिशनचा विस्तार, त्याची व्याप्ती नदी स्वच्छ करण्यापेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. हा आपल्या इच्छाशक्तीचा आणि अथक प्रयत्नांचा एक दृश्य पुरावा असल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा