34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषलोकवाड्मयगृहचे प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांचे निधन

लोकवाड्मयगृहचे प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांचे निधन

Google News Follow

Related

लोकवाड्मयगृहमध्ये आपल्या कलात्मकतेच्या जोरावर अनेक पुस्तकांची निर्मिती आणि पुस्तकांना आकर्षक स्वरूप प्राप्त करून देणारे चित्रकार, मुद्रणतज्ज्ञ, प्रकाशक प्रकाश विश्वासराव यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.

विश्वासराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रकाश विश्वासराव यांनी कलेची सेवा तर केलीच पण अनेक तरुणांना त्यांनी घडविले, त्यांच्यात कलागुण रुजविले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी या क्षेत्रात निर्माण झाल्याची भावना त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक कलाकारांनी व्यक्त केली.

प्रकाश विश्वासराव यांना दोन अडीच वर्षे न्यूरोलॉजिकल आजार होता. त्यामुळे ते बिछान्याला खिळलेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्या उपचारांना ते फारसा प्रतिसाद देत नव्हते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना गुरुवारी रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथेच  त्यांची प्राणज्योत मालवली.

 

हे ही वाचा:

सामान्य नागरिकांना त्रास न देता मोदींचा निघाला ताफा! झाले कौतुक…

२०३० पर्यंत चीनकडे हजार अण्वस्त्र

एक पोटनिवडणूक जिंकून यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडतायत

महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?

 

पुस्तक निर्मितीत विश्वासराव यांचे मोठे योगदान होते. लोकवाडमय गृह या प्रकाशन संस्थेत त्यांनी आपल्या कलात्मकतेची अमीट छाप सोडली.  ते मुळात चित्रकार होते. चित्रकार म्हणूनच त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. मासिकांमध्ये अनेक रेखाटन, व्हीज्युअल्स त्यांनी तयार केली. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यासंदर्भात राजन बावडेकर यांनी सांगितले की, विश्वासराव हे प्रारंभी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असत. पण त्यांचा आर्ट वर्ककडे ओढा होता. शिवशक्तीच्या इथे मराठाचे ऑफिस होते. तिथे ते प्रेसमध्ये बसत. नारायण सुर्वेंनी त्यांना हेरले आणि लोकवाड्मयगृहात त्यांना आणले. त्यांनी मग अनेक पुस्तकांची कव्हर्स बनविली. दाजी पणशीकरांचे महाभारत सुडाचा प्रवास, तुळशी परबचा कवितासंग्रह, भारतीय साहित्यशास्त्र अनवट पुस्तकाचे कव्हर त्यांनी बनविले. १९८७-८८मध्ये लोकवाड्मयगृहाचे प्रकाशक झाले. या पुस्तकाला लेआऊट, कलेच्या अंगानी पुस्तके सजविली. बाबासाहेबांचे चित्रचरित्र त्यांनी तयार केले. उमेदवारीच्या काळात १९७०च्या दशकात त्यांचे पाच लोकांचे टोळके होते. डिंपलचे अशोक मुळे, आयएनटीचे सुरेश चिखले, कादंबरीकार बी.एन. चव्हाण, फाडफाड इंग्लिशवाले कोकाटे आणि स्वतः विश्वासराव. त्या दोस्तीवर बी.एन. चव्हाण यांनी दोस्तायन अशी कादंबरी लिहिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा