27 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
घरविशेषशेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!

शेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Google News Follow

Related

प्रदूषणात वाढ होऊ नये, यासाठी पंजाबमध्ये शेतांतील राबला आग लावण्यास प्रतिबंध करणाऱ्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र आग लावण्यास विरोध करणाऱ्या पथकातील एका अधिकाऱ्यालाच शेतकऱ्यांनी राब जाळायला लावल्याची घटना भटिंडा येथे घडली आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी काही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संदर्भातील व्हिडीओ त्यांच्या ‘एक्स’ या खात्यावरून शुक्रवारी पोस्ट करून शेतकऱ्यांच्या या कृतीचा निषेध केला. ‘सरकारचे अधिकारी शेतकऱ्यांना पिकांचे राब जाळू नका, असे सांगण्यास गेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या जमावाने त्यांना जबरदस्तीने ते जाळायला लावले. हे सहनशक्तीच्या पलीकडचे आहे,’ असे भगवंत मान यांनी म्हटले आहे.या व्हिडीओत दोन शेतकरी एका अधिकाऱ्याचा हात पकडून त्याला काडेपेटीने राब जाळायला लावत असल्याचे दिसत आहे.

‘हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत,’ अशी माहिती भटिंडाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुलनीत सिंग खुराना यांनी दिली. एका अधिकाऱ्याला त्याच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे पत्र भटिंडाचे पोलिस उपायुक्त शौकत अहमद पारे यांनी वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना पाठवले होते.

हे ही वाचा:

आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!

कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील

नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात

बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप

‘एका शेतकरी संघटनेशी संबंधित असलेल्या ५० ते ६० जणांच्या शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्याला घेराव घातला होता. त्यांनी या अधिकाऱ्याला जवळच्या शेतात नेले आणि जबरदस्तीने त्याला राब जाळायला लावले. या अधिकाऱ्याला इतक्या जणांनी घेराव घातल्यानंतर तो करू तरी काय शकणार होता? त्याच्याजवळ काही पर्यायही नव्हता,’ असे पॅरे यांनी सांगितले. पॅरेही लवकरच या गावाला स्वतः भेट देणार आहेत. आम्ही हे प्रकरण असेच सोडून देणार नाही. अशाप्रकारे कायद्याचे उल्लंघन आम्ही सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.पंजाब, हरियाणामध्ये शेतजमिनींमधील राबला आग लावल्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील प्रदूषणात तीव्र वाढ होते. पंजाबमध्ये शुक्रवारी शेतातील राब जाळण्याच्या एकूण १२ हजार ८१३ घटना घडल्याचे पंजाब सरकारतर्फे सांगण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा