25 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरविशेषआयएएस बनण्याची गोष्ट... सहा गोळ्या लागूनही जिवंत!

आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!

वृत्तसंस्था, लखनऊ

Google News Follow

Related

आयपीएस मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी यांच्या सत्यकथेवर आधारित विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला ‘१२वी फेल’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उदंड गर्दी करत आहेत. टीव्ही, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक ठिकाणी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. चित्रपट पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असलेले समाज कल्याण मंत्री असिम अरुण यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी गुंडांनी झाडलेल्या पाच गोळ्या पोटात आणि एक डोक्यात लागलेल्या रिंकू राही यांचा आयएएस बनण्याचा प्रवास मांडला आहे.

राजकारणात प्रवेश करण्याआधी असिम अरुण स्वतः एक आयपीएस अधिकारी होते. त्यांनी कानपूरमध्ये पोलिस आयुक्तपदी असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. सन २०२२मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कन्नौज मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे तीनवेळा आमदार राहिलेले अनिल दोहरे यांचा पराभव केला होता. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले. असिम अरुण यांचे वडील श्रीराम अरुण उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक राहिले आहेत.

हे ही वाचा:

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीतून करणार वसुली

छत्तीसगडमधील काँग्रेसने तर ‘महादेव’लाही सोडले नाही!

उद्योगपती अबानींना धमकी देणारा अखेर अटकेत

विदर्भ, मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांतून ३ लाख रोजगार निर्मिती

‘हमारा हिरो: रिंकू राही’ या शीर्षकांतर्गत शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असीम अरुण लिहितात… ‘काल १२वी फेल चित्रपट पाहिला. जो आयपीएस मनोज शर्मा यांच्या कठोर परिश्रम, चिकाटीची गोष्ट सांगतो. मात्र अशीच एक गोष्ट रिंकू राहीचीही आहे. विशेष म्हणजे त्यांना उत्तर प्रदेश कॅडर मिळाले आहे,’ असे त्यांनी सांगितले.
सन २००८मध्ये रिंकू राही समाज कल्याण अधिकारी म्हणून मुझफ्फरनगरमध्ये नियुक्त झाले. तिथे त्यांनी विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध ठोस कारवाई केली. त्यामुळे माफियांनी त्यांच्यावर हल्ला केला. तिथे त्यांच्या पोटात पाच तर डोक्यात एक गोळी लागली. ते मरण पावले, असे समजून हल्लेखोर त्यांना तिथेच टाकून गेले. मात्र ते वाचले. तब्बल दोन वर्षांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली.

रिंकू हे हापूडस्थित सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती आयएएस-पीसीएस कोचिंगचे काम पाहात होते. प्रत्येक वर्षी चांगल्या संख्येने मुले येथे येत होती. रिंकू यांच्या आणखी काही परीक्षा शिल्लक होत्या. मी रिंकू यांना पुन्हा परीक्षा द्यायला सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. मात्र मुलाखतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पुन्हा गुण कमी पडले. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा तयारी केली. परिणामी, सन २०२३मध्ये उत्तर प्रदेश सरकारद्वारा चालवल्या जाणाऱ्या विविध कोचिंग क्लासमधून २४ जण निवडले गेले असून त्यात रिंकू राही यांचाही समावेश आहे. सर्वांत आधी यादीमध्य रिंकू राही यांना भारतीय महसूल विभागात (कस्टम्स)नियुक्ती मिळाली होती. मात्र त्यांची सेवा बदलण्याची शक्यता होती. काही महिन्यांनंतर त्यांना आयएएस मिळाले आणि कॅडरही उत्तर प्रदेश मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, अशा शब्दांत असिम अरुण यांनी रिंकू राहीची गोष्ट कथन केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा