32 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरक्राईमनामाबीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीतून करणार वसुली

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीतून करणार वसुली

११ कोटींचे नुकसान, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती

Google News Follow

Related

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाले होते. बीड जिल्ह्यात याच्या जास्त झळा बसल्या होत्या. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले होते. याशिवाय माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीलादेखील आग लावण्यात आली होती. मात्र, या हिंसक आंदोलनातील आरोपींना हे महागात पडणार असून त्यांच्याकडून सुमारे ११ कोटींची वसुली करण्यात येणार आहे.

बीड शहर आणि माजलगावमध्ये झालेल्या हिंसाचारात ११ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपींकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार करण्यात येत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल, अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या १४४ आरोपींना अटक तर २ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या १४४ आरोपींना बीड पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर, २ हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. इतर आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगडमधील काँग्रेसने तर ‘महादेव’लाही सोडले नाही!

उद्योगपती अबानींना धमकी देणारा अखेर अटकेत

विदर्भ, मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांतून ३ लाख रोजगार निर्मिती

मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवा!

बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसचीही तोडफोड यावेळी करण्यात आली होती. त्यामुळे, बीडमध्ये जमावाने फोडलेल्या ६१ बसेसच्या काचा बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
111,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा