26 C
Mumbai
Tuesday, July 16, 2024
घरविशेषमेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवा!

मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवा!

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Google News Follow

Related

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध  योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध  योजनांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शितलकुमार मुकणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा.. 

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य

भूपेश बघेल सरकारने निवडणुकीसाठी वापरला हवालाचा पैसा

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर; संघात प्रसिद्ध कृष्णाची लागली वर्णी

नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप; भारताकडून मदतीचे आश्वासन

 

यावेळी  विखे पाटील म्हणाले,महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरणासाठी निधी देण्यात आला आहे.महामंडळाचे भाग भांडवल वाढविण्याबाबत ही निर्णय घेण्यात येईल.राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा आढावा घेण्यात आला. महामंडळाच्या माध्यमातून शेळी समुह योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश ही यावेळी दिले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा