30 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरदेश दुनियानेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप; भारताकडून मदतीचे आश्वासन

नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप; भारताकडून मदतीचे आश्वासन

१२९ जणांनी गमावला प्राण

Google News Follow

Related

भारताचा शेजारी असलेला नेपाळ शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. नेपाळमध्ये ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची नोंद झाली आहे. १२९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जाजरकोट आणि पश्चिम रुकुमध्ये सर्वाधिक नुकसान झालय. त्यानंतर रात्री उशिरा तीव्र भूकंपाचे धक्के भारतात उत्तर प्रदेश, दिल्ली, पटना, झारखंड आणि बिहारपर्यंत जाणवले.

नेपाळमधील जाजरकोटमध्ये सर्वाधिक नुकसान झालं असून यासंबंधीची माहिती जाजरकोट जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक संतोष रोका यांनी सांगितले. मृतांमध्ये नलगढ नगरपालिकेच्या उपमहापौर सरिता सिंह सुद्धा आहेत, अशी माहिती संतोष रोका यांनी दिली आहे. ६.४ रिश्टर स्केलच्या जोरदार भूकंपानंतर नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. भीतीने अनेक नागरिकांनी घराच्या बाहेर धाव घेतली होती. अनेक घरे जमीनदोस्त झाली असून १२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील भूकंपाच्या या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “या भूकंपात जे नुकसान झालं, ज्यांनी प्राण गमावले, त्या बद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. भारत भक्कमपणे एकजुटीने नेपाळी जनतेच्या पाठिशी उभा आहे. आम्ही शक्य ती सर्व मदत करु. ज्या कुटुंबानी या भूकंपात आप्तस्वकियांना गमावलं, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जे जखमी आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा:

इस्रायलचा गाझामधील शाळेवर एअर स्ट्राईक; २० जण ठार

उर्फी जावेद आली अडचणीत, बनावट पोलिसांना घेऊन व्हीडिओ बनविल्याचा आरोप

बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!

जरांगेंनी उपोषण सोडल्यावर राज्य सरकारची ठोस पावले

जाजरकोटमध्ये भूकंपाचे केंद्र आहे. याचं भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के सामान्य समजले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा