अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात वाद झाल्याचे वृत्त आहे. लेबनॉनमधील इस्रायलच्या वाढत्या लष्करी मोहिमेवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोलताना फोन कॉलवर संताप व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे या संघर्षामुळे इराणसोबतच्या संवेदनशील वाटाघाटींमध्ये अडथळा येऊ नये यासाठी वॉशिंग्टनची धडपड सुरू आहे.
इस्रायलने बेरूतच्या दक्षिण उपनगरांमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर हल्ल्यांचे आदेश दिल्यानंतर आणि दक्षिण लेबनॉनमधील जमिनीवरील कारवायांचा विस्तार केल्यानंतर ही अभूतपूर्व चकमक झाली, ज्यामुळे व्यापक प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आणि तेहरानकडून नवीन इशारे देण्यात आले. वृत्तानुसार, ट्रम्प यांनी नेतान्याहूंवर इस्रायलला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्याचा आणि इराणसोबतच्या अमेरिकेच्या राजनैतिक प्रयत्नांना धोक्यात आणण्याचा आरोप केला. या संभाषणाची माहिती असलेल्या दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी आणि आणखी एका सूत्राने सांगितले की, ट्रम्प यांनी नेतान्याहूंना ‘वेडे’ म्हटले आणि इस्रायली नेते परिणामांची पर्वा न करता वागत असल्याची तक्रार केली.
एका अमेरिकी अधिकाऱ्याने ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना असे म्हटल्याचे सांगितले की, “तुम्ही पूर्णपणे वेडे आहात. मी नसतो तर तुम्ही तुरुंगात असता. मी तुमचा जीव वाचवत आहे. आता सगळे तुमचा तिरस्कार करतात. यामुळे सगळे इस्रायलचा तिरस्कार करतात.”
हे ही वाचा:
अंडर-२० आशियाई अॅथलेटिक्समध्ये भारताचा सुवर्णझंकार!
भारत अमेरिका व्यापार कराराचे ९९ टक्के काम पूर्ण
‘इराणने भारतावर क्षेपणास्त्र डागावीत आणि मोदींना हटवावे,’ विकृत मुस्लिम व्यक्तीचा व्हीडिओ
सोमवारी नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी, हिजबुल्लाहने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे आणि इस्रायली भूभागावर हल्ले केल्याचे कारण देत, बेरूतच्या दाहिये जिल्ह्यातील हिजबुल्लाह-नियंत्रित भागांवर हल्ले करण्याचे आदेश दिल्यानंतर हा संघर्ष तीव्र झाला. या घोषणेमुळे मोठ्या हवाई हल्ल्यांच्या भीतीने लेबनीज राजधानीच्या दक्षिण उपनगरांतील रहिवाशांनी पलायन केले. हिजबुल्लाहला पाठिंबा देणाऱ्या इराणने इशारा दिला आहे की, लेबनॉनमधील इस्रायलचे सततचे हल्ले, अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर तणाव कमी करण्याच्या उद्देशाने वॉशिंग्टनसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींना बाधा आणू शकतात. इराणी अधिकाऱ्यांनी वारंवार आग्रह धरला आहे की, लेबनॉनमधील शस्त्रसंधी हा अमेरिकेसोबतच्या कोणत्याही व्यापक सामंजस्याचा एक महत्त्वाचा घटक आहे.







