गेल्या एक वर्षापासून बांगलादेशात दंगलखोर दंगल घडवत आहेत. आता या दंगलखोरांनी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घराला लक्ष्य केले आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे हे वडिलोपार्जित घर बांगलादेशातील सिरायगंज जिल्ह्यात आहे. जमावाने त्यांच्या घराची तोडफोड केली आहे. बांगलादेश पोलिस सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘रवींद्र कचरीबारी’, ज्याला रवींद्र स्मारक संग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी ८ जून रोजी एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासह रवींद्रनाथ टागोर संग्रहालयाला भेट देण्यासाठी आली होती. यावेळी या व्यक्तीचा मोटारसायकल पार्किंग शुल्कावरून जागेची देखभाल करणाऱ्या लोकांशी वाद झाला. वाद इतका वाढला कि कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला एका खोलीत बंद करून मारहाण केली, असा आरोप आहे.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मंगळवारी रहिवाशांनी निषेधार्थ मानवी साखळी तयार केली, त्यानंतर जमावाने कॅम्पसमध्ये घुसखोरी केली. कचरीबारी येथील सभागृहाची तोडफोड करण्यात आली आणि संस्थेच्या संचालकांवर शारीरिक हल्ला करण्यात आला.
सरकारी बीएसएस वृत्तसंस्थेनुसार, पुरातत्व विभागाने हल्ल्याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीला पाच कामकाजाच्या दिवसांत त्यांचे निष्कर्ष सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बसेस
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले
डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित काय योजना बघा
दरम्यान, या हल्ल्यावर प्रतिक्रिया भाजपने संताप व्यक्त केला आणि सरकारवर टीका केली. भाजप खासदार संबित पात्रा यांनी आरोप केला आहे की, बांगलादेश जमात-ए-इस्लामी आणि हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेश या कट्टरपंथी गटांनी हा हल्ला केला. भाजप आमदार आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, ही घटना “आपल्या सामायिक वारशावर, आपल्या ओळखीवर आणि आपल्या मूल्यांवर हल्ला आहे”.







