29 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरविशेष‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर हजार कोटींची भरारी

‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर हजार कोटींची भरारी

१,००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ११ वा भारतीय चित्रपट

Google News Follow

अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण: पार्ट वन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने जगभरात १,००० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यासह १,००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा ११ वा भारतीय चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम करणारा तो तिसरा सर्वात वेगवान भारतीय चित्रपट ठरला आहे.

आकडेवारीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी चित्रपटाने आठव्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये मिळून ५३.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे भारतातील एकूण नेट कलेक्शन ५६४.६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील ग्रॉस कमाई ६७५.०५ कोटी रुपये झाली आहे. परदेशातील बाजारपेठांमधून चित्रपटाने आतापर्यंत ३५८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन १,०३३.५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने मोठे विक्रम केले आहेत. अवघ्या आठ दिवसांत ५६० कोटी रुपयांचा टप्पा पार करत चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि रणबीर कपूरच्याच ‘ऍनिमल’ या चित्रपटांच्या भारतातील एकूण लाइफटाइम कमाईला मागे टाकले आहे. ‘पठाण’ने भारतात ५४४.२८ कोटी, तर ‘ऍनिमल’ने ५५६.३६ कोटी रुपयांची नेट कमाई केली होती.

हे ही वाचा:

संभलमध्ये मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!

महापौर कार्यालयासह मुंबईतील सहा ठिकाणांना धमकी

यूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती

जगभरात १,००० कोटींचा टप्पा गाठण्याच्या वेगाचा विचार केला, तर ‘रामायण’च्या पुढे केवळ ‘पुष्पा २ : द रूल’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हे दोन चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांनी अवघ्या सात दिवसांत हा टप्पा गाठला होता. ‘बाहुबली २’ला यासाठी १० दिवस, ‘आरआरआर’ला १६ दिवस, तर ‘जवान’ला १८ दिवस लागले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा