24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरविशेषरणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने अमेरिकेत रचला इतिहास!

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने अमेरिकेत रचला इतिहास!

एक दशलक्ष पार करणारा 'अ‍ॅनिमल' चित्रपट ठरला पहिला हिंदी चित्रपट

Google News Follow

Related

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने अमेरिकेत इतिहास रचला आहे.अमेरिकेत एक दशलक्ष पार करणारा हा चित्रपट पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘अ‍ॅनिमल’च्या अधिकृत ट्विटर हँडलने १ डिसेंबर रोजी ही बातमी शेअर केली. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा हे आहेत.या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.चित्रपटात रणबीर आणि अनिल कपूरचे यांचे पात्र पिता-पुत्राचे दाखवण्यात आले आहे.

 

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला जगभरातील चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या ट्विटर हँडलने शेअर केले की ‘अ‍ॅनिमल’ हा अमेरिकेत $१ दशलक्षचा टप्पा ओलांडणारा पहिला हिंदी चित्रपट आहे. पुढे लिहिले होते, “इतिहास घडला आहे!! #Animal ने १ मिलियन ओलांडले अमेरिकेत प्रीमियरसाठी ५:३० पीएसटी! ही कामगिरी करणारा पहिला हिंदी चित्रपट! आणखी बरेच विक्रम मोडले जातील! #AnimalPremieres #AnimalTheFilm, असे ट्विट केले आहे.

हे ही वाचा:

अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!

बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

इस्रायलकडून हमासवर पुन्हा हल्ले सुरू!

नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर लावले फलक

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. रणबीरचे पात्र, रणविजय सिंग नावाच्या गँगस्टरचे वर्णन एक असा माणूस आहे जो निर्दयी आणि महत्वाकांक्षी आहे, आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. या कथेत बाप आणि मुलाच्या नात्यातला गोंधळ दाखवण्यात आलेला आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा