30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषउद्योग जगतातील आसामी रतन टाटांना 'आसाम वैभव'

उद्योग जगतातील आसामी रतन टाटांना ‘आसाम वैभव’

Google News Follow

Related

असम दिवस किंवा आसाम दिनानिमित्त, राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी उद्योगपती रतन टाटा यांना प्रतिष्ठेच्या ‘आसाम वैभव’ पुरस्कारान सन्मानित करण्याची घोषणा केली.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी आसाम वैभव, आसाम सौरव आणि आसाम  गौरव या पुरस्कारांसाठी १९ व्यक्तिमत्त्वांची नावे जाहीर केली आहेत. समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा यांना असोम वैभव आणि ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन यांना असोम सौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

टाटा ट्रस्टने आसाममधील कर्करोग्यांची काळजी घेण्याच्या दिशेने केलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल, आसाम सरकारने टाटा यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार गुरुवारी प्रदान केला. तर सरमा यांनी पत्रकार परिषदेत आसाम सौरव’ आणि आसाम गौरव’ पुरस्कार विजेते घोषित केले. ते म्हणाले, ” पुरस्काराच्या माध्यमातून आसाम सरकार उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील विविध घटकांतील लोकांचा गौरव करतात. आसाम वैभव पुरस्कार हा आसाम राज्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे.”

शिक्षणतज्ज्ञ प्रा. कमलेंदू देब क्रोडी, एनएचएम मिशन डायरेक्टर डॉ. लक्ष्मणन ए, शिक्षणतज्ञ आणि उद्योगपती प्रा. दीपक चंद जैन आणि कलाविश्वातील नील पवन बरुआ यांना “आसाम सौरभ” सन्मान देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेश ठरले १०० टक्के लसीकरण करणारे पहिले राज्य

मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार दुरावण्याच्या भीतीतूनच नार्वेकरांचे ट्विट

राज्यातील निवासी डॉक्टर ‘या’ मागणीसाठी संपावर

‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’

 

तर १३ जणांना आसाम गौरव सन्मान देण्यात येणार आहे. मुनींद्र नाथ नगेट, मनोज कुमार बासुमतारी, हेमप्रभा चुटिया, धरणीधर बोरो, डॉ बसंत हजारिका, खोरसिंग तेरांग, श्रीमती नमिता कलिता, कौशिक बरुआ, बॉबी हजारिका, आकाश ज्योती गोगोई, बोर्निता मोमीन, कल्पना बोरो आणि डॉ आसिफ इक्बाल अशी त्यांची नावे आहेत.

तपशिल देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आसाममध्ये ६०० वर्षे राज्य करणाऱ्या अहोम घराण्याची स्थापना करणाऱ्या स्वर्गदेव चाओलुंग सुकाफा यांच्या राजवटीच्या स्मरणार्थ २ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या असम दिवसाला हे पुरस्कार प्रदान केले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा