रूपाणी यांचा डीएनए अद्याप जुळला नाही !

रूपाणी यांचा डीएनए अद्याप जुळला नाही !

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. अपघातानंतर तीन दिवस उलटूनही त्यांचा डीएनए अहवाल अद्याप जुळलेला नाही. रविवारी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर रजनीश पटेल यांनी डीएनए तपासणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.

डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितले की, आतापर्यंत ३१ मृतदेहांचे डीएनए जुळले असून, त्यातील १२ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा डीएनए अहवाल जुळवण्याची प्रक्रिया सुरू असून, अद्याप त्यांचा अहवाल जुळलेला नाही. अहवाल जुळताच अधिकृत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विजय रूपाणी हे त्या एअर इंडिया फ्लाईटमध्ये प्रवास करत होते, जी लंडनच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झाली. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यापैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात केवळ एक व्यक्ती बचावली. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला.

हेही वाचा..

ब्रिटनमध्ये सात पाकिस्तानी दोषी; दोन मुलींचे लैंगिक शोषण

गोवंडीत डंपरच्या धडकेत एकाच कुटूंबातील चौघे ठार

संत समाजाने मानले शनी शिंगणापूर देवस्थानाचे आभार!

ब्लॅक बॉक्स डेटा डीकोड केला जातोय!

या अगोदर हॉस्पिटल अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी सांगितले की, मृतदेह त्यांच्या नातेवाइकांना देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राज्य सरकारकडून पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. डॉ. जोशी यांनी माहिती दिली की, अपघाताची माहिती मिळताच २५० हून अधिक डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. यामुळे अनेक जिव वाचवता आले. जखमींवर वेळेत उपचार करण्यात आले आणि मृतांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या साहाय्याने डीएनए नमुने जुळवण्याचे काम सुरू आहे.

विमान अपघातानंतर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रवाशांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष मदत व्यवस्थेची आखणी करण्यात आली आहे. यासाठी रुग्णालय प्रशासनाने १० विशेष संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. नातेवाइकांनी रुग्णालयाच्या डी २ ब्लॉकमधील कंट्रोल रूममध्ये प्रत्यक्ष संपर्क साधावा लागेल. आधी संपर्क साधलेला मोबाईल क्रमांक वापरूनच कोणतीही अडचण असल्यास कॉल करता येईल.

Exit mobile version