29 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
घरविशेषबुडालेल्या मुलांचा शोध घेताना एसडीआरएफचे जवान बुडाले, तिघांचा मृत्यू

बुडालेल्या मुलांचा शोध घेताना एसडीआरएफचे जवान बुडाले, तिघांचा मृत्यू

अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीमधील घटना

Google News Follow

Related

उजनी धरण पात्रात बोट बुडाल्याने सहा जणांना आपला जीव गमवावा लागला ही घटना ताजी असतानाचं आता अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत एसडीआरफचीचं बोट उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जवान आणि एक स्थानिक व्यक्ती बुडाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी प्रवरा नदीत दोन तरुण बुडाले होते. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता. दरम्यान, शोध कार्यासाठी गुरुवारी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या तरुणाचा शोध घेत असतानाच ही बोट बुडाली. यात एसडीआरएफच्या पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून आणखी एकाचा आणि स्थानिकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक

उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?

अपघातानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; अनधिकृत पबवर हातोडा!

न्यायालय परिसरात विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण पात्रात मंगळवार, २१ मे रोजी संध्याकाळी वादळी वारा आणि पावसामुळे बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. सहा जण या दुर्घटनेमुळे बेपत्ता होते. अखेर सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान जोरदार हवा सुरू झाली आणि पावसानेही हजेरी लावली. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. या बोटीत एकूण सात प्रवासी होते. त्यातील एका प्रवाशाला पोहता येत असल्याने तो पोहत किनाऱ्यावर आला. मात्र, बाकीचे बेपत्ता होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा