नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळालेले आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले श्री निलेश लंके यांनी आज चक्क पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला. याची चर्चा माध्यमामध्ये झाल्यानंतर त्यांनी यावर सारवासारव केली असली तरी लंके यांच्या या कृत्याचा निषेध होत आहे.