जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये पोलिस आणि लष्कराचे ऑपरेशन सुरू आहे. ७५ ओवर ग्राउंड वर्कर्सना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एनआयए आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ३ हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. अटक केलेले बहुतेक लोक दक्षिण काश्मीरमधील आहेत. पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना स्थानिक लोकांनी मदत केल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
एनआयएच्या सूत्रांच्या हवाल्याने पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या समोर आल्या आहेत. एनआयएने २० हून अधिक ओजीडब्ल्यू (ओव्हर ग्राउंड वर्कर्स) यांना अटक केली आहे आणि त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. कोट भालवाल तुरुंगात बंद असलेल्या दोन ओव्हरग्राउंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करत आहेत.
एनआयएची टीम लवकरच लष्करच्या दोन ओव्हर ग्राउंड वर्कर्स निसार अहमद हाजी आणि मुस्ताक हुसेन यांची चौकशी करण्यासाठी जाऊ शकते. हे दोघेही ओव्हरग्राउंड वर्कर्स एलईटीच्या दहशतवाद्यांना मदत करत आहेत. भाटा धुरिया आणि तोतागली येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याबद्दल या दोघांनाही २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा :
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणांवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले
पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या एकाला पुण्यातून अटक
राजधानीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरी, पूंछ येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणारे दहशतवादी गट आणि पहलगाममधील बैसरन खोऱ्यात हल्ला करणारे गट एकमेकांशी जोडलेले असू शकतात. त्यामुळे कोट भालवाल तुरुंगात बंद असलेल्या दोन ओव्हर ग्राउंड वर्कर्सची चौकशी तपास संस्थांकडून केली जाणार आहे.
दुसरीकडे, सुरक्षा दलांना संशय आहे की गेल्या १० दिवसांपासून दहशतवादी जंगलात लपून बसले आहेत. यामुळेच सुरक्षा दल या भागात सखोल शोध मोहीम राबवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम, बेसरन व्हॅली, तरनू हप्तगुंड, डावरू आणि लगतच्या परिसरातील घनदाट जंगलात सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहेत.







