31 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषकाय पंचकर्म, काय योगासनं, शहाजी बापू पाटलांच वजन एकदम ओक्के

काय पंचकर्म, काय योगासनं, शहाजी बापू पाटलांच वजन एकदम ओक्के

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात केले वजन कमी

Google News Follow

Related

काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल,  सगळं एकदम ओके…या संवादामुळे प्रचंड लोकप्रिय झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबाबत आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे.

शहाजी बापू पाटील यांनी ८ दिवसांत आपले वजन ९ किलोंनी कमी केले आहे. बेंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापूंनी वजन कमी करण्यासाठी पंचकर्म केले. त्यातून त्यांना ९ किलो वजन कमी करता आले. २४ डिसेंबरला ते या कार्यक्रमात सहभागी झाले आणि तिथे त्यांचे वजन कमालीचे खाली आले. पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करून त्यांनी आपल्या वजनात घट केली आहे.

हे ही वाचा:

नितेश राणे यांनी शेअर केला सुशांत सिंगचा पोस्टमार्टेमचा ‘तो’ व्हिडीओ

मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्य

क्राइम पेट्रोलमध्ये विकृत ‘आफताब’ दाखवला हिंदू

अजितदादा आव्हाडांच्या पंगतीत बसले !

हे वजन कमी करण्यासाठी त्यांनी काही खास उपाय केले. त्यात आसने, आहार, पथ्यपाणी करून त्यांनी आपल्या शरीराचे वजन घटविण्याचा यशस्वी प्रयोग केला. शहाजीबापू या आश्रमात पहाटे पाच वाजता उठत असत. तिथे उकडलेल्या पालेभाज्या, कडधान्ये यांचा आहार त्यांना घ्यावा लागत असे. वाफेवर उकडलेल्या भाज्या आणि चपात्या असे पौष्टिक जेवण त्यांना दिले जात असे. ध्यानसाधना, योगसाधना आणि मेडिटेशन करून त्यांनी आपल्या वजनावर नियंत्रण मिळविले.

शहाजी बापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांच्यासोबत सूरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. एका कार्यकर्त्याने त्यांनी फोन लावला तेव्हा ते ज्या हॉटेलमध्ये राहात होते, त्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्याकडे मन मोकळे केले. तेव्हा ते तेथील वातावरण कसे आहे हे सांगताना काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं एकमद ओक्के असे म्हणाले होते. त्यांचे ते वाक्य प्रचंड लोकप्रिय झाले. एकदम ओके या शब्दांचा वापर राजकीय आरोप प्रत्यारोपांसाठी वारंवार झाला. अगदी ते जेव्हा गुवाहाटीवरून आले तेव्हाही त्यांच्या मुलाखतीत त्यांना हा संवाद म्हणायला लावण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा