दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये मानदुखीची दुखापत झाल्यानंतर संघाबाहेर गेलेला शुभमन गिल आता पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. वनडे मालिकेतून दूर राहिल्यानंतर गिल टी20 मालिकेत पुनरागमन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शुभमन गिल सोमवारी बेंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलन्स (COE)मध्ये दाखल होणार आहेत. तेथे त्यांच्या मानदुखीसाठी रिहॅब प्रक्रिया सुरू होईल. COE गिलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी परवानगी देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
कोलकात्यात झालेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात चौकार खेचताना गिल मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे ते उर्वरित टेस्ट मालिकेत खेळू शकले नाहीत. दुखापतीनंतर त्यांनी मुंबईतील स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तीन दिवस तिथे राहून स्वतःचा रिहॅबही सुरू ठेवला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होत आहे. पुढील काही दिवसांत भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. गिलने रिहॅबदरम्यान चांगल्या प्रकारे मेहनत घेतली असून ते लवकरात लवकर मैदानावर परतण्यास उत्सुक आहेत.
हेही वाचा :
जपानमध्ये मुस्लिमांच्या कबरींना विरोध, स्वदेशात जाऊन दफन करा!
‘उमीद’वर वक्फ मालमत्तेची माहिती अपलोड न केल्यास भरावा लागणार दंड!
‘भारतमाता की जय’ला नाक मुरडणाऱ्या भाजपा नेत्याला हाकला!
निखिल कामतच्या पुढील पॉडकास्टमध्ये दिसणार एलन मस्क
क्रिकबझला मिळालेल्या माहितीनुसार,
“गिलने रिहॅब प्रक्रियेत उत्तम मेहनत घेतली आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास ते 6-7 डिसेंबरला कटकमध्ये टी20 संघात सामील होतील,” असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही टी20 मालिकेसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. बुमराहला वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.
टी20 मालिकेतील सामने:
-
9 डिसेंबर — कटक
-
11 डिसेंबर — नवी चंदीगड
-
14 डिसेंबर — धर्मशाळा
-
17 डिसेंबर — लखनऊ
-
19 डिसेंबर — अहमदाबाद







