29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषसीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुतनिक व्ही चे उत्पादन?

सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुतनिक व्ही चे उत्पादन?

Google News Follow

Related

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे रशियाच्या स्पुतनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीसाठी टेस्ट लायसन्स मागितलं आहे. अशी माहिती मिळत आहे. सध्या सीरम भारतामध्ये कोविशिल्ड लसीचे उत्पादन करत आहे. कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरला भारत सरकारनं मंजुरी दिलेली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं बुधवारी डीसीजीआयला स्पुतनिक व्ही लसीच्या निर्मितीसाठी चाचणी परवाना देण्यासंबंधी अर्ज केल्याची माहिती आहे. रशियाची स्पुतनिक वी लस सध्या भारतात तयार करण्याचं काम डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी करत आहे.दुसरीकडे सीरमनं जून महिन्यात भारत सरकारला कोविशील्ड लसीचे १० कोटी डोस पुरवणार असल्याचं यापूर्वीचं जाहीर केलं आहे. बुधवारी रशियाच्या स्पुतनिक वी लसीचे ३० हजार डोस भारतातील हैदराबाद येथे पोहोचले आहेत.

सीरमकडून नोवावॅक्स लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये डीसीजीआयनं यासाठी आपत्कालीन परावनगी दिलेली आहे.

भारतीय औषध निर्माती कंपनी पॅनेशिया बायोटेकनं बनवलेली स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप चाचणीसाठी रशियाला रवाना करण्यात आली आहे. रशियात त्या लसीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात येणार आहे. स्पुतनिक व्ही लसीची निर्मिती हिमाचल प्रदेशातील एका कंपनीमध्ये करण्यात आळी आहे. गुणवत्ता चाचणी यशस्वी ठरल्यास उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही

पुलवाम्यात भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या

पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’

‘तुझ्या बापाला’ वर महापौर म्हणतात, मी लिहिलंच नाही

रशियाची आरडीआयएफ आणि पॅनेशिया बायोटेक यांच्यासोबत एप्रिलमध्येच स्पुतनिक व्ही लसीचं उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली होती. पॅनेशिया बायोटेक यावर्षाच्या अखेरपर्यंत १० कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. आरआयडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिमित्रीव यांनी पॅनेशिया बायोटेकच्या साथीनं कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन या महामारीशी लढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असं म्हटलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा