28 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषएसआयआर फेज-२ : १२ राज्यांमध्ये ९९.५३ टक्के गणना प्रपत्रांचे वितरण

एसआयआर फेज-२ : १२ राज्यांमध्ये ९९.५३ टक्के गणना प्रपत्रांचे वितरण

डिजिटलीकरण ७८.९७ टक्के

Google News Follow

Related

बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला वेग आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी जारी केलेल्या दैनिक बुलेटिननुसार, १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९९.५३% गणना प्रपत्रे (ईएफ) वितरित केली गेली आहेत. दैनिक बुलेटिननुसार, देशभरातील ईएफ वितरण ९९.५३% वर पोहोचले आहे. ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या काळात चालणाऱ्या गणना टप्प्यात पात्र ५०.९७ कोटी मतदारांपैकी ५०.७३ कोटींना ईएफ आधीच वितरित करण्यात आले आहेत. ईएफचे डिजिटलीकरणही जलदगतीने वाढत आहे — ४०.२५ कोटी फॉर्म्स डिजिटल करण्यात आले असून, एकूण डिजिटलीकरण दर ७८.९७% झाला आहे.

गोवा आणि लक्षद्वीप यांनी १००% वितरण पूर्ण केले आहे. त्यानंतर अंदमान-निकोबार ९९.९९%, मध्य प्रदेश ९९.९%, पश्चिम बंगाल ९९.८५%, आणि गुजरात ९९.८२% वर आहेत. मतदारसंख्येनुसार सर्वात मोठ्या राज्य उत्तर प्रदेशात १५.४० कोटीपेक्षा जास्त मतदारांना कव्हर करत ९९.७४% वितरण पूर्ण झाले आहे. सर्वात कमी कामगिरी करणाऱ्यांमध्ये केरळ : ९८.४%, पुडुचेरी : ९८.३९, तामिळनाडू : ९८.३४% पश्चिम बंगालमध्ये ७.६५ कोटी (९९.८५%) ईएफ वाटप झाले असून त्यापैकी ९१.७७% फॉर्म्सचे डिजिटलीकरण पूर्ण झाले आहे.

हेही वाचा..

अरविंद केजरीवाल यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देत दिल्लीतील बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश

भारत-इस्रायल व्यापार चर्चेतून काय लाभ होतोय ?

दिल्ली स्फोट: पाकिस्तान, बांगलादेशमधून पदवी मिळवलेल्या डॉक्टरांची मागवली माहिती

माओवादी म्हणतायत महिनाभर थांबा… बिळातील साप, शांतीची कबूतरे एकाच वेळी बाहेर

डिजिटलीकरण बाबतीत लक्षद्वीप : १००% (सर्वात पुढे), गोवा : ९५.१७%, राजस्थान : ९२.६६% तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक संथ गती फक्त ६०.९१% डिजिटलीकरण, त्यानंतर केरळ : ७३.०२%. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राजकीय पक्षांनी सत्यापन आणि डिजिटलीकरण गतीमान करण्यासाठी अधिक बूथ-स्तरीय एजंट्स नियुक्त करावेत. राजस्थानातील आकडेवारीमध्ये अंता विधानसभा क्षेत्र वगळण्यात आले आहे, कारण उपनिवडणुकीमुळे त्या ठिकाणी सुधारणा प्रक्रिया स्थगित आहे. ४ डिसेंबरच्या अंतिम मुदतीकडे प्रक्रिया जसजशी वाटचाल करेल, तसतसे आयोग आपले ठरलेले बुलेटिन जारी करत राहील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा