28.3 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरविशेषउत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू

बद्रीनाथहून परतताना काळाचा घाला

Google News Follow

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरात झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सहाही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) बद्रीनाथ धाम येथून देहरादूनच्या दिशेने परतणारे ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर छई गावाजवळील डोंगराळ भागात कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह पाच प्रवासी होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्यानंतर प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली होती. काही वेळातच दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील एकही व्यक्ती वाचू शकली नसल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर बद्रीनाथ येथून देहरादूनमधील सहस्रधारा विमानतळाच्या दिशेने रवाना झाले होते. जोशीमठजवळील हाथी पर्वत परिसरात असताना हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. त्यानंतर छई गावाजवळ डोंगराळ भागातून धूर निघताना स्थानिकांच्या निदर्शनास आले. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी आणि कॅप्टन हिमांशू हे पायलट होते. प्रवाशांची नावे प्रतापा, अरुण, शंकर गौडा, सुधीर के. आणि एच. एस. नटराजा अशी असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने शोध आणि बचावकार्य सुरू केले.
हे ही वाचा:

‘सार्वजनिक महाभियोगा’वर पावसाचे पाणी

न्यूझीलंडकडून भारताचा ८७ धावांनी धुव्वा!

विनेश फोगाटला हायकोर्टाचा दिलासा

जेमिमा मैदानात पुनरागमनासाठी सज्ज!

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसडीआरएफ, पोलीस, भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. दुर्गम डोंगराळ प्रदेश आणि खराब हवामानामुळे बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेची दखल घेत संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले. प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरुवातीला हेलिकॉप्टर बेपत्ता असल्याची माहिती होती; मात्र त्याचे अवशेष सापडल्यानंतर दुर्घटनेची भीषणता स्पष्ट झाली.

दरम्यान, अपघाताच्या दिवशी चमोली जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. उत्तराखंडच्या पर्वतीय भागात पाऊस आणि हिमवृष्टीमुळे हवामान अत्यंत प्रतिकूल बनले होते. त्यामुळे खराब हवामान हे दुर्घटनेमागील संभाव्य कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेने उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील हेलिकॉप्टर वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा