33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषझेल सुटले आणि सामनाही निसटला

झेल सुटले आणि सामनाही निसटला

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ धावांनी लढत गमावली

Google News Follow

Related

भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडलेले झेल भारताच्या पराभवास कारणीभूत ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी झेल सोडण्याची मालिका सुरू ठेवल्याने भारताला ९ धावांनी हार पत्करावी लागली. पावसामुळे ही लढत ४० षटकांची ठेवण्यात आली.

मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, बिष्णोई यांनी हे झेल सोडले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने २५० धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवण्यात यश मिळविले आणि या महागात पडलेल्या धावाच भारताच्या पराभवास कारणीभूत ठरल्या.

भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले. ३८व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर बिष्णोईने त्याचा झेल सोडला. बिष्णोईला झेलाचा अंदाजच आला नाही. त्याच षटकात सिराजने आवेश खानच्या गोलंदाजीवर मिलरचा झेल सोडला. मिड विकेटला उंच उडालेला मिलरचा फटका झेलण्याच्या प्रयत्नात सिराजचा अंदाज चुकला. हातातून चेंडू खाली पडला. पुन्हा एकदा झेलण्याचा प्रयत्न त्याने केला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याच षटकात एका बॉलबॉयने सीमारेषेबाहेर उत्कृष्ट झेल टिपत भारतीय क्षेत्ररक्षकांना आदर्श घालून दिला. ३८व्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या मिलरने डीप मिडविकेटला चेंडू भिरकावला, तो या बॉलबॉयने झेलला.

हे ही वाचा:

उद्धवजी, दीड वर्षाच्या मुलाचा नगरसेवकपदावर डोळा असं वक्तव्य केलंत तुम्ही?

ठाकरेंच्या घराणेशाहीवर शिंदेंचा बाण

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८० कोटींचे हेरॉईन जप्त

तर ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होऊ देणार नाही

 

त्याआधी, सलामीवीर जॅनेमन मालन याला शुभमन गिलने जीवदान दिले. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या गिलने मालनचा सोपा झेल सोडला. मात्र मालनला मोठी खेळी उभारता आली नाही. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ३७व्या षटकात मिलरने मैदानाच्या रेषेत जोरदार फटका मारला होता. ऋतुराज गायकवाडने पुढे झेप घेत चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तो अपयशी ठरला. भारतीय क्षेत्ररक्षकांच्या चुकांचा फटका अखेर भारताला बसलाच. त्यावरून सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंवर टीकेची झोड उठली. एकाने प्रतिक्रिया व्यक्त केली की भारतीय २५ टक्के झेल सोडतात तर ७५ टक्के पकडतात. मात्र यावेळी १०० टक्के कामगिरी केली. पण झेल पकडण्यात नव्हे तर सोडण्यात. एकाने लिहिले की, भारतीय खेळाडू झेल पकडण्याच्या बाबतीत गंभीर नाहीत. झेल सोडल्यानंतरही ते हास्यविनोदात रंगले आहेत.

भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेने या भारतीय क्षेत्ररक्षकांच्या चुकांचा फायदा उठवत २४९ धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यात सलामीवीर क्विन्टन डीकॉकने ४८ धावांची खेळी केली. पण हाइनरिच क्लासेनने केलेली नाबाद ७४ तर डेव्हिड मिलरची नाबाद ७५ धावांची खेळी महत्त्वाची ठरली. दोघांनी १३९ धावांची भागीदारी करत अडीचशेपर्यंत धावा जमविल्या. भारतीयांनी त्यांचे झेल सोडले नसते तर कदाचित यापेक्षाही कमी धावसंख्येत त्यांना रोखता आले असते.

दक्षिण आफ्रिकेच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीयांची मात्र दमछाक झाली. टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यामुळे राखीव खेळाडूंचा संघ या मालिकेत उतरविण्यात आला आहे.

भारताचे सलामीवीर शिखर धवन, शुभमन गिल अपयशी ठरले. दोघांनी अनुक्रमे ४ आणि ३ धावा केल्या. श्रेयस अय्यर (५०) आणि संजू सॅमसन (८६) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. शार्दुल ठाकूरने ३३ धावांची खेळी केली. पण भारताला ते पराभवापासून वाचवू शकले नाहीत. क्लासेन सामन्यात सर्वोत्तम ठरला.

स्कोअरबोर्ड

दक्षिण आफ्रिका ४० षटकांत ४ बाद २४९ (मालन २२, डीकॉक ४८, क्लासेन ना. ७४, मिलर ना. ७५, शार्दुल ठाकूर ३५-२) विजयी वि. भारत ४० षटकांत ८ बाद २४० (ऋतुराज गायकवाड १९, इशान किशन २०, श्रेयस ५०, सॅमसन ना. ८६, रबाडा ३६-२, एनगिडी ५२-३).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा