25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरविशेषवर्ल्डकप अंतिम सामन्याआधी हवाई दलाचा विशेष ‘एअर शो’

वर्ल्डकप अंतिम सामन्याआधी हवाई दलाचा विशेष ‘एअर शो’

विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच देशाच्या हवाई दलाचा सहभाग

Google News Follow

Related

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाचा सूर्यकिरण एरोबॅटिक संघ ‘एअर शो’ सादर करणार आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंतप्रधानांची उपस्थिती आणि एअर शो या दोन्ही गोष्टी खूपच विशेष आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही देशाच्या हवाई दलाचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे या शोचे विशेष आकर्षण असणार आहे. संरक्षण विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, सूर्यकिरण एरोबॅटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्या अंतिम सामन्यापूर्वी सूर्यकिरणचा एरोबॅटिक संघ १० मिनिटे आपल्या अॅक्रोबॅटिक्सने स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. या पार्श्वभूमीवर एअर शोचा सराव शुक्रवार आणि शनिवारी होईल. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये सामान्यतः नऊ विमानांचा समावेश असतो आणि त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियात शीख व्यक्तीच्या गाडीवर ओरखडे, आक्षेपार्ह चित्र

नूहमध्ये पुन्हा जातीय तणाव; विहिरीचे पूजन करण्यास जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक?

‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

अहमदाबादमधील ‘फायनल’ ठरते आहे महागडी

रविवारी होणारा हा सामना खास बनवण्यासाठी बीसीसीआयने अनेक मोठ्या व्यवस्था करत आहे. भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताने त्यांच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पुन्हा एका अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय चाहते १२ वर्षांपासून विश्वचषक विजेतेपदाची वाट पाहत आहेत. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून विजेतेपदासाठीच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा