मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि सदस्यामध्ये झालेल्या वादाचे व्हिडीओ आणि मेसेजस सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे ‘प्रेसक्लब’ची बदनामी होत असल्या कारणाने १० डिसेंबर रोजी सायंकाळी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. मात्र विशेष सर्वसाधारण सभेत दोन गट तयार होऊन सभेत गोंधळ उडाला आणि सभेच्या अध्यक्षानी ही सभा रद्द केली.
२५ ऑक्टोबर रोजी, पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता यांच्या निवडणूक फसवणुकीवर आधारित ‘महाराष्ट्र मॅनिप्युलेटेड? या माहितीपटाच्या प्रदर्शनापूर्वी मुंबईतील प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस आणि एका हिंदी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी तथा प्रेसक्लबचे सदस्य राजेश कुमार यांच्यात शाब्दिक वाद झाला होता.
हे ही वाचा:
हृदयापासून पचनापर्यंत संपूर्ण शरीराची कोण करतो सुरक्षा?
वाहन कर्ज विभागाचे एयूएम दरवर्षी १७ टक्क्यांच्या दराने वाढणार
पोटदुखीपासून खोकल्यापर्यंत ‘अजवाइन’ वरदान
तुम्हीही किडनी स्टोनला आमंत्रण देत नाही?
या वादातून दोन गट तयार झाले आणि हा वाद सोशल मीडियावर प्रकट होऊन वादाचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत होते. काही जणांनी प्रेसक्लबचे अध्यक्षा विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले.
या वादात प्रेसक्लबची नाहक बदनामी होत असल्यामुळे या प्रकरणाची सत्यता बाहेर काढण्यासाठी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली होती. प्रेसक्लबचे अध्यक्ष खडस यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असून त्यांना नोटीस देऊन निलंबित करण्यात येणार असल्याची कुजबुज प्रेसक्लब सदस्यांमध्ये सुरू झाली.
राजेश कुमार गट विरुद्ध प्रेसक्लब अध्यक्ष समर खडस गट तयार होऊन दोन्ही गटाकडून सदस्यांची स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली होती,वरिष्ठ सभासदाकडून या वादावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी करण्यात आली होती. प्रेसक्लब कमिटीने १० डिसेंबर रोजी सायंकाळी विशेष सर्व साधारण सभा प्रेसक्लबच्या गच्चीवर आयोजित केली होती. या सभेला मोठ्या प्रमाणात प्रेसक्लबचे वरिष्ठ सदस्य आणि इतर सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सभेला सुरुवातच वादातून होऊन काही सदस्य आपले म्हणणे मांडत असताना काही सदस्यांनी सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ वाढत गेला आणि सभेचे अध्यक्ष यांनी ही सभा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करून विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली.







