27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषअनिल देशमुख, संजय राऊतांचे गँग भोजन...नितेश राणेंनी शेअर केले फोटो !

अनिल देशमुख, संजय राऊतांचे गँग भोजन…नितेश राणेंनी शेअर केले फोटो !

कुख्यात गुंडासोबत घेतले होते जेवण

Google News Follow

Related

भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याला ‘गॅंग भोजन’ असे म्हटले आहे. या फोटोमध्ये संजय राऊत, अनिल देशमुख, गौतम भटकर नामक आदी व्यक्ती जेवताना दिसत आहेत. यातील गौतम भटकर हा कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर मोक्कासह खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत हे काल रविवारी (१८ ऑगस्ट) नागपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यादरम्यान संजय राऊत यांनी अनिल देशमुखांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान संजय राऊत आणि अनिल देशमुख यांचे भोजन करतानाचे फोटो समोर आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी हे फोटो ट्विटरवर शेअर करत टीका केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हणाले की, ‘गॅंग भोजन!’, हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भोंगा संज्या. दोघेही बेलवर बाहेर आहेत. नागपुरात जेवणाचा आनंद घेत आहेत. हरकत नाही. पण बेलवरचे हे दोन्ही आरोपी कुणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकर सोबत आहे. हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या. या भटकरवर मोक्का सुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर आहेत. आता अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार. मग भाषणात कशाला सांगता नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले. जैसी करनी वैसी भरनी, असे भाजपचे नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

बाळासाहेबांची इच्छा नव्हती, परंतु उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली !

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील विश्वास उडाला !

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोईनुद्दीनला अटक

ममता बॅनर्जींना शिवीगाळ करणाऱ्यांची ‘बोटे तोडा’

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा