महानगर पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरु झालाय, अशी पुन्हा भाषणे सुरु होतील. अशा लोकांना मी सांगू इच्छितो तुमच्यामध्येही आणि कोणाच्या बापामध्येही ताकद नाही कि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करतील, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नुकतीच निवड झाली. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. दरम्यान, फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत प्रतिक्रिया दिली. ते निशाना साधत म्हणाले, सीधी बात नो बकवास…
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजपाचे सरकार आल्यानंतर मुंबईचा चेहरा बदलून दाखवला, वर्षानुवर्षे तुम्ही राज्य केले. केवळ महानगर पालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात, शेवटी त्या कोंबडीला चीरण्याचे काम तुम्ही केले. मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचे काम तुम्ही केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, गिरगावातल्या, दक्षिण मुंबईतील मराठी माणूस हद्दपार झालेला आहे. याला दोषी कोण?, याचे उत्तर द्या. तुम्ही केवळ मराठीच्या नावावर राजकारण करत राहिलात, त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो. आपण जे केले त्याच्याविरुद्ध बोलायचे आणि जिंकलो-जिंकलो म्हणून सांगायचे, असा त्रीभाषा संदर्भावरून टोला मुख्यमंत्र्यानी लगावला.
हे ही वाचा :
ईसीआयसोबत राजकीय पक्षांची बैठक
मालीमध्ये तीन भारतीयांचे अपहरण !
जुन्या वाहनांना इंधन देण्यावर का बंदी ?
समिक भट्टाचार्य पश्चिम बंगाल भाजपचे नवे अध्यक्ष
हिंदीची सक्ती म्हणून यांनी बोलण्यास सुरु केले. राज्यात फक्त मराठीची सक्ती आहे, ती शिकावीच लागेल. त्याचबरोबर हिंदीसह भारतातील सर्व भाष्यांचा अभिमान आहे. समिती तयार गेली आहे, कोणाच्याही दबावाला बळी न पडता राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे जे असेल तो निर्णय आम्ही घेवू, मराठी माणसाचं हित आमच्यापुढे आहे. कोणाची युती झाली पाहिजे-नाही झाली पाहिजे यावरून राजकारण करणारे आम्ही नाहीतर राज्याच्या हिताकरिता आम्ही राजकारण करणारे आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सीधी बात नो बकवास… pic.twitter.com/YPKtlaAU77
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 3, 2025







