पश्चिम बंगाल भाजपने राज्यसभा खासदार समिक भट्टाचार्य यांची नवीन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीसह भाजपने राज्यात आपल्या नेतृत्वाच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. समिक भट्टाचार्य यांच्यावर आता पक्षाची राज्यातील उपस्थिती अधिक भक्कम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या या निवड प्रक्रियेचा समारोप एका औपचारिक कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमात सांसद रविशंकर प्रसाद यांनी रिटर्निंग ऑफिसरच्या भूमिकेतून भट्टाचार्य यांच्या निवडीच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली आणि त्यांच्या अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा केली. या आधी सुकांत मजूमदार हे पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष होते. त्यांची नियुक्ती २०२१ मध्ये झाली होती. आता ही जबाबदारी समिक भट्टाचार्य यांच्याकडे सोपवली गेली आहे.
हेही वाचा…
‘रामायण’चा पहिला प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित
अमरनाथ यात्रेसाठी दुसरा जत्था रवाना
कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोजित मिश्राचा वकिली परवाना रद्द!
पंतप्रधान मोदींना घानाच्या सर्वोच्च नागरी सन्मान
समिक भट्टाचार्य हे त्यांच्या स्पष्ट आणि रणनीतिक दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पश्चिम बंगालच्या हितासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांची ही निवड पक्षाच्या त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. त्यांची ही नियुक्ती अशा काळात झाली आहे, जेव्हा भाजप राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) टक्कर देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
येत्या वर्षीच पश्चिम बंगाल विधानसभेचे निवडणूक होणार आहेत, जी भट्टाचार्य यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातील सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे. भाजपकडून ही नियुक्ती एक राजकीयदृष्ट्या निर्णायक पाऊल मानली जात असून, समिक भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पश्चिम बंगालमध्ये नवीन जोमाने कार्यरत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
