29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषबारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा 'हा' नवा विक्रम

बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग-९२५ वरील गंधव भकासर विभागावर आपत्कालीन लँडिंग रनवेचे उद्घाटन केले. हवाई दलाच्या विमानाने राष्ट्रीय महामार्गावर मॉक इमर्जन्सी लँडिंग केले यावेळी दोन्ही नेते विमानात उपस्थित होते. इंडियन एअर फोर्सचं सुखोई सू-३० एमकेआय लढाऊ विमान आणि सी-१३०जे सुपर हर्क्युलस विमानांचा यामध्ये समावेश होता.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा हवाई रनवे पाकिस्तान सीमेपासून काही अंतरावर आहे. भारत कोणत्याही आव्हानासाठी नेहमीच तयार असतो हे हवाई रनवेमुळे स्पष्ट होतं आहे. तीन किलोमीटर लांबीचा हा रनवे १९ महिन्यांत तयार करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातही हे काम पूर्ण केले गेले आहे. या आपत्कालीन लँडिंग फील्डच्या बांधकामामुळे मनात उत्साह, सुरक्षिततेबद्दल आत्मविश्वासही निर्माण होत असल्यानं आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष दिवस आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी राजस्थानच्या जालोर येथील राष्ट्रीय महामार्गावरील इमर्जन्सी फील्ड लँडिंगमध्ये लँडिंग प्रात्यक्षिक पाहिले.केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाने बुधवारी ट्विटरवर पोस्ट करुन या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली होती.

राजनाथ सिंह एमआरएसएएम इंडक्शन फंक्शनमध्ये सहभागी होतील. जैसलमेरमध्ये तैनात असलेल्या हवाई दलाच्या जवानांशी राजनाथ सिंह संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग एनएच-९२५ चा वापर पहिल्यांदाच इंडियन एअर फोर्सच्या विमानाच्या आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

हे ही वाचा:

ऐन गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी

आज मोदी ब्रिक्स परिषदेला संबोधणार

सचिन वाझे ५ स्टार हॉटेलमध्ये वेश्येला भेटायला

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या रनवेचा वापर युद्धाच्या काळात फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय तीन हेलिपॅडही तयार करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या महामार्गाचे उद्घाटन करतील. हा रन वे युद्धाच्या वेळी हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या लँडिंगसाठी देखील वापरता येईल. युद्धादरम्यान, बहुतेक शत्रू हवाई दलाच्या हवाई तळाचा नाश करतात, अशा परिस्थितीत महामार्गावरील ही हवाई पट्टी हवाई दलाच्या विमानांसाठी खूप प्रभावी ठरणार आहे. केवळ बाडमेरमध्येच नाही, तर जैसलमेर जोधपूरमध्येही बनवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा