30.8 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरविशेषलावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

आज संध्याकाळी मरिन लाइन्स येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Google News Follow

मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुलोचना चव्हाण यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे. आज संध्याकाळी मरिन लाइन्स येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर सुलोचना यांनी अधिराज्य केले. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजाने जादू केली. याच वर्षी सुलोचना यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आले होते. तेव्हा व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी तो स्वीकारला होता. तेव्हापासून सुलोचना यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचे दिसले होते. यानंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही दिसल्या नाहीत.

१३ मार्च १९३३ रोजी सुलोचना यांचा जन्म झाला. सुलोचना कदम असे त्यांचे नाव पुढे लग्नानंतर त्या सुलोचना चव्हाण झाल्या. त्यांचे शालेय शिक्षण चौथीपर्यंत झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. लग्नाआधी त्यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले होते.

हे ही वाचा :

महाराष्ट्रात पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना संधी

‘लव्ह जिहाद’ कायद्याची पडताळणी सुरु, फडणवीसांची माहिती

‘या’ शहरात आहे सोन्याची नाणी देणारे एटीएम

भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

सुलोचना यांना गंगा-जमना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे राम कदम पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच यावर्षी पद्मश्री पुरस्कारानेसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा