सुप्रिया सुळे याच ईव्हीएमवर जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का?

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल 

सुप्रिया सुळे याच ईव्हीएमवर जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का?

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे, असे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद पार पडली. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगापुढे सवाल उभे करत उत्तर देण्यास आवाहन केले. यावेळी उबाठाचे खासदार शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे देखील होत्या. यावेळी तीनही नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

हे ही वाचा : 

अमेरिका लवकरच आणखी ४८७ बेकायदेशीर भारतीयांना हद्दपार करणार!

फडणवीस राहुलना म्हणाले, एकही चुटकुला बार बार सुनाया…

पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार!

१५ कोटी रुपये ऑफर केल्याच्या दाव्यानंतर एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी

विरोधकांच्या टीकेला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेनं काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्यानं नाकारलं आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही.

आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे. खरं तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘मी याच ईव्हीएमवर विजयी झाले‘ असं सांगितलं होतं. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्यानं ते सत्य स्वीकारणार नाहीत. राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Exit mobile version