26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरविशेषस्वप्ना पाटकर संजय राऊतांच्या भावाला देणार निवडणुकीत टक्कर!

स्वप्ना पाटकर संजय राऊतांच्या भावाला देणार निवडणुकीत टक्कर!

विक्रोळीतून सुनील राऊत यांच्याविरोधात अपक्ष लढणार

Google News Follow

Related

विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे घोषित करण्यात येत आहेत. विधानसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांनी भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अजूनही पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केले जात आहेत. याच दरम्यान, स्वप्ना पाटकर यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात स्वप्ना पाटकर देखील उतरल्या आहेत. स्वप्ना पाटकर यांनी स्वतः ट्वीटकरत याबाबत माहिती दिली.

डॉ. स्वप्ना पाटकर या महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार आहेत. तसेच संजय राऊत यांच्या जवळचे नेते सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. या प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटकही केली होती. सध्या संजय राऊत जामिनावर आहेत. स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची न्यायालयात सुरु असलेली लढाई आता निवडणुकीमध्येही दिसणार आहे. कारण स्वप्ना पाटकर निवडणूक लढणार आहेत, विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे बंधू ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत विरुद्ध स्वप्ना पाटकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.

पत्राचाळ, खिचडी कंत्राट यासारख्या आपण केलेल्या भ्रष्टाचारावर भाष्य होऊ नये यासाठी साक्षीदारांना अत्याचाराच्या धमक्या देणाऱ्या घाबरट आणि पळकुट्या लोकांशी आता मी थेट दोन हात करणार असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी म्हटले आहे. स्वप्ना पाटकर यांनी ट्वीटकरत म्हटले, सत्यमेव जयते. स्त्री दुर्गा असते लक्ष्मी असते. तिचा सन्मान करता येत नाही त्यांना आयुष्यात काहीच नीट करता येत नाही. माझा लोकशाही आणि न्यायालयावर प्रचंड विश्वास आहे. लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या महोत्सवात १५६- विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेत आहे.

हे ही वाचा : 

बोरिवलीतून संजय उपाध्याय, वसईतून स्नेहा दुबे, तर सावनेरमधून आशिष देशमुख!

संत एकनाथ महाराजांच्या वंशजांचा आशीर्वाद घेत एकनाथ शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज

‘वारी एनर्जी म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोलाची भर!’

मारुतीचे दर्शन घेत अजित पवार, युगेंद्र पवारांनी बारामतीतून केले अर्ज दाखल

संजय राऊत यांचे नाव न घेता स्वप्ना भाटकर यांनी ट्वीटकरत म्हटले, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, शासन-प्रशासनाबाबत रोज सकाळी भोंगे वाजवणारे लोक स्वतः कुपमंडूक वृत्तीचे आहेत. महिलांचा सन्मान आणि त्यांची सुरक्षितता यावर त्यांची अत्यंत गंभीर मते आहेत. मात्र प्रत्यक्षात एका महिलेचे शोषण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. भ्रष्टाचारातून मिळणारे लोणी ओरपणाऱ्या लोकांना लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मात्र प्रत्यक्षात एका महिलेचे शोषण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

भ्रष्टाचारातून मिळणारे लोणी ओरपणाऱ्या लोकांना लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तो लढा सुरू ठेवतानाच आता विक्रोळी मतदारसंघातून मी जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत उतरत आहे. दररोज सकाळी उठून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे लोकप्रतिनिधी असूच शकत नाहीत. त्यांचा गोतावळाही तसाच, असे स्वप्ना भाटकर यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा