31 C
Mumbai
Thursday, August 27, 2026
घरविशेषदिल्लीतील शाळांमध्ये स्वाइन फ्लूचा अलर्ट

दिल्लीतील शाळांमध्ये स्वाइन फ्लूचा अलर्ट

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक मार्गदर्शक सूचना

Google News Follow

Related

दिल्ली-एनसीआरमध्ये स्वाइन फ्लू म्हणजेच एच१एन१च्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने राजधानीतील शाळांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारी, अनुदानित तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या परिस्थितीमुळे घाबरून जाण्याची गरज नसून योग्य काळजी आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षण संचालनालयाने शाळांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. सकाळच्या प्रार्थना सभेत, वर्गांमध्ये, नोटीस बोर्डवर तसेच शाळेच्या डिजिटल माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्वाइन फ्लूपासून बचावाच्या उपायांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड झाकणे, वापरलेले टिश्यू योग्य पद्धतीने कचरापेटीत टाकणे आणि साबणाने नियमित हात धुणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश आहेत. विशेषतः जेवणापूर्वी तसेच खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
तळोज्यात ४,७१० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट; १५ जणांवर गुन्हा

भाजप आमदाराच्या मुलीने महिला पोलीसाच्या कानशिलात लगावली

फटाक्याचा त्रास झाला म्हणून गणेश मिरवणुकीवर अंडी फेकली, आरोपी दानिशला अटक

सात वर्षांनी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर?

एच१एन१ची प्रमुख लक्षणे म्हणून घसा खवखवणे, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणे आणि काही प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशी लक्षणे आढळल्यास विद्यार्थ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी आजारी असताना शाळेत येणे टाळावे आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

श्वसनाशी संबंधित लक्षणे असलेल्या व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणी किंवा गरजेनुसार मास्कचा वापर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. वर्गखोल्या आणि कॉमन एरियामध्ये पुरेसे वायुवीजन ठेवण्याबरोबरच वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी पुरेसे पाणी प्यावे, पौष्टिक आहार घ्यावा, पुरेशी विश्रांती घ्यावी आणि डोळे, नाक व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे किंवा अँटिबायोटिक्स घेऊ नयेत, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये एच१एन१च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. केंद्र सरकारनेही परिस्थितीवर लक्ष ठेवून निगराणी आणि आरोग्य व्यवस्थेच्या तयारीवर भर दिला आहे. शिक्षण संचालनालयाने जिल्हा आणि विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांना शाळांमध्ये या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले असून त्याचा एकत्रित अहवाल ३१ ऑगस्ट २०२६पर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळांमध्ये सध्या घबराटीपेक्षा खबरदारी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक जागरूकतेला प्राधान्य देण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा