अहमदाबाद गुन्हे शाखेने एक धक्कादायक कारवाई करत सीरियन नागरिकांची टोळी उघडकीस आणली आहे, जी स्वत:ला गाझा येथील युद्धपीडित म्हणून सादर करून मशिदींमधून पैसे उकळत होती. या प्रकरणात अली मेघत अलझाहर या सीरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, अली मेघत अलझाहर पर्यटक व्हिसावर भारतात आला होता. त्याने स्वत:सह आणखी काही साथीदारांच्या मदतीने गाझा संघर्षग्रस्त असल्याचा बनाव करून विविध मशिदींमधून आर्थिक मदत मागितली आणि ती गोळा केली.
चौकशीत अलीने कबूल केले की, मिळवलेले पैसे कोणत्याही मदतीसाठी नव्हते, तर तो स्वत:चे विलासी जीवन (आरामदायी) जगण्यासाठी त्याचा वापर करत होता. महागडी हॉटेलं, ब्रँडेड कपडे, आणि खासगी वाहने यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर अलीचे तीन साथीदार फरार झाले असून, ते अंडरग्राउंड झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा :
गुवाहाटीमध्ये ४१ फूट उंच गणेश मूर्ती ठरणार विशेष आकर्षण!
कोल्हापूरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी, १० जण जखमी, वाहने जाळली!
विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चेहऱ्यावर पडले १७ टाके!
पोलिसांनी सांगितले की, उकळलेले पैसे नेमके कुठे आणि कशासाठी वापरले जात होते, याचा तपास सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणाही यामागे आंतरराष्ट्रीय आर्थिक नेटवर्क किंवा दहशतवादाशी संबंध आहेत का, याची चौकशी करत आहेत. अली मेघत अलझाहर याच्यावर डिटेन्शन, ब्लॅकलिस्टिंग आणि भारतातून हकालपटीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेने दिली. या प्रकरणी तपास सुरू असून अधिक माहिती पुढील काही दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे.
जेसीपी गुन्हे शाखेचे शरद सिंघल म्हणाले, अहमदाबाद गुन्हे शाखेला माहिती मिळाली की चार संशयित व्यक्ती, जे स्वतःला पॅलेस्टाईनचे असल्याचे सांगत आहेत आणि अरबी भाषेत बोलत आहेत, ते विविध मशिदींना भेट देत आहेत. ते पॅलेस्टाईनमधील फुटेज दाखवत आहेत आणि सहानुभूती मिळवून मुस्लिमांकडून पैसे गोळा करत आहेत… काल, सीरियाचा रहिवासी असलेल्या अली मेगत अलजहर नावाच्या संशयित व्यक्तीला येथील एका हॉटेलमध्ये ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून ३,६०० अमेरिकी डॉलर्स, २५,००० रुपये रोख भारतीय चलन, तसेच दोन मोबाईल जप्त करण्यात आले. एक मोबाईल त्याच्याकडे सीरियातून आला होता आणि दुसरा कोलकात्यातून घेण्यात आलेला होता,” असे शरद सिंगल यांनी सांगितले.
पोलीस तपासात सध्या तरी असा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही की हे पैसे प्रत्यक्षात पॅलेस्टाईनला पाठवले जात होते. हे पैसे नेमके कुठे जात होते, याचा तपास सुरू असून या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभाग (IB), राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), आणि अॅन्टी टेररिझम स्क्वॉड (ATS) यांचीही मदत घेतली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Ahmedabad, Gujarat: JCP Crime Branch Sharad Singhal says, "Ahmedabad crime branch received information that four suspected individuals, claiming to be from Palestine and speaking in Arabic, are visiting various mosques. They are showing footage from Palestine and, by… pic.twitter.com/hnvOaxSQe5
— ANI (@ANI) August 23, 2025
The Ahmedabad Crime Branch has busted a Syrian gang extorting money from mosques by posing as Gaza victims. The police have detained a Syrian national named Ali Meghat Alzahar. He had come to India on a tourist visa. During interrogation, it was revealed that he was using the…
— ANI (@ANI) August 23, 2025







