29 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषजम्मू-काश्मीरची 'तहरीक-ए-हुर्रियत' दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

जम्मू-काश्मीरची ‘तहरीक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या ‘तहरीक-ए-हुर्रियतला’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत लिहिले, ‘तहरीक-ए-हुर्रियत’ जम्मू-काश्मीर यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आली आहे. ही संघटना बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेली असून जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करून राज्यात इस्लामिक शासन स्थापन करायचे आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तेहरीक-ए-हुर्रियतची स्थापना भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी करण्यात आली होती.

गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू-काश्मीर यूएपीए अंतर्गत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत कोणतीही व्यक्ती किंवा संघटना भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली आढळल्यास ती नष्ट केली जाईल.

गृहमंत्री अमित शहा ट्विट केले की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत, J&K (TeH) ला UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी निषिद्ध क्रियाकलापांमध्ये ही संघटना सहभागी आहे. हा गट भारतविरोधी प्रचार करत असल्याचे आणि दहशतवादी कारवाया सुरू ठेवत असल्याचे आढळून आले आहे…— अमित शाह (@AmitShah) ३१ डिसेंबर २०२३ , असे गृहमंत्री शहा यांनी केले आहे.

हे ही वाचा:

म्यानमार मधून मिझोराममध्ये पोहचलेल्या १५१ सैनिकांना भारताचा आधार!

जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

इम्रान खान निवडणूक लढण्यास अपात्र

‘सर्व निर्णय घेताना प्रथम असते फक्त राष्ट्रहित’!

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी २००४ मध्ये तहरीक-ए-हुर्रियतची स्थापना केली होती. गिलानी यांच्यानंतर तेहरीक-ए-हुर्रियतचे अध्यक्ष मुहम्मद अशरफ सेहराय होते, त्यांचेही २०२१ मध्ये निधन झाले. ही संघटना हुर्रियत कॉन्फरन्सची सहयोगी संघटना आहे. हुर्रियत कॉन्फरन्स हा जम्मू-काश्मीरमधील २६ संघटनांचा एक गट आहे, ज्याची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. हुर्रियत कॉन्फरन्समध्ये पाकिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी समजल्या जाणाऱ्या अनेक संघटनांचा समावेश आहे. यामध्ये जमात-ए-इस्लामी, जेकेएलएफ आणि दुख्तरन-ए-मिल्लत इत्यादींच्या नावांचा समावेश आहे. २००५ मध्ये हुर्रियत कॉन्फरन्स दोन गटात विभागली गेली. मिरवाईज उमर फारुख यांना त्यांच्या मध्यम गटाचे नेतृत्व मिळाले. या अतिरेकी गटाचे नेतृत्व सय्यद अली शाह गिलानी करत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा